येवला शहरातील रस्त्यांची दूदर्शा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2020 18:36 IST2020-08-19T18:36:16+5:302020-08-19T18:36:46+5:30
येवला : शहरातील रस्त्यांची अतिशय दुरावस्था झाली असून मार्गावरुन पादचाऱ्यांना चालणे मुश्कील झाले आहे. नगरपालिकेने सदर रस्त्यांची तातडीने दुरूस्ती करावी याकरीता निवेदन देण्यात आले.

येवला शहरातील रस्त्यांची दूदर्शा
ठळक मुद्देरस्त्यासंदर्भात मात्र लोकप्रतिनिधींची उदासिनता
लोकमत न्यूज नेटवर्क
येवला : शहरातील रस्त्यांची अतिशय दुरावस्था झाली असून मार्गावरुन पादचाऱ्यांना चालणे मुश्कील झाले आहे. नगरपालिकेने सदर रस्त्यांची तातडीने दुरूस्ती करावी याकरीता निवेदन देण्यात आले.
रस्त्यांवर मोठ मोठे खड्डे पडून त्यात पावसाच्या पाण्याने डबकी तयार झाली आहेत. परिणामी ये-जा करणाºया वाहनांमुळे पादचाऱ्यांच्या अंगावर घाण पाणी उडून रोज कटकटी होत आहेत. या रस्त्यासंदर्भात मात्र लोकप्रतिनिधींची उदासिनता दिसत आहे. सद्या रस्त्याचा दर्जा अत्यंत खालावला गेला नसल्याने हे खराब रस्ते त्वरीत दुरुस्त करण्यात आवेत अशी मागणी निवेदनात म्हटले आहे.