हिंगणवेढे परिसरात बिबट्याचे दर्शन
By Admin | Updated: August 9, 2016 01:02 IST2016-08-09T01:01:41+5:302016-08-09T01:02:22+5:30
हिंगणवेढे परिसरात बिबट्याचे दर्शन

हिंगणवेढे परिसरात बिबट्याचे दर्शन
चाडेगाव : हिंगणवेढे व आजूबाजूच्या परिसरामध्ये गेल्या दोन-तीन दिवसांपासून बिबट्याचे दर्शन होत असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
गेल्या आठवड्यात झालेला मुसळधार पाऊस व नदीला आलेल्या पुरामुळे पाणी नदीकाठच्या शेतात शिरल्याने गेल्या दोन-तीन दिवसांपासून ग्रामस्थांना बिबट्याचे दर्शन होत आहे.
रविवारी रात्री अशोक सुकदेव धात्रक यांच्या वस्तीवर बिबट्याने दोन शेळ्या फस्त केल्याचे सोमवारी सकाळी निदर्शनास आले. यामुळे परिसरातील ग्रामस्थांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. वनविभागाने हिंगणवेढे परिसरात बिबट्यास जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावावा, अशी मागणी उपसरपंच संतोष धात्रक, गंगाधर धात्रक, वाल्मीक धात्रक, अरुण धात्रक आदिंनी केली आहे. (वार्ताहर)