विदित पोहोचला उपांत्यपूर्व फेरीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:16 IST2021-07-27T04:16:11+5:302021-07-27T04:16:11+5:30
नाशिक : रशियातील सोची शहरात सुरू असलेल्या बुद्धिबळाच्या फिडे वर्ल्ड कपमध्ये नाशिकचा ग्रॅन्डमास्टर विदित गुजराथी याने शनिवारी रात्री झालेल्या ...

विदित पोहोचला उपांत्यपूर्व फेरीत
नाशिक : रशियातील सोची शहरात सुरू असलेल्या बुद्धिबळाच्या फिडे वर्ल्ड कपमध्ये नाशिकचा ग्रॅन्डमास्टर विदित गुजराथी याने शनिवारी रात्री झालेल्या पाचव्या फेरीतील पहिल्या गेममध्ये अझरबैजानच्या वॅसिफ ड्युराबायलीशी सामना ड्रॉ केला, तर रविवारच्या दुसऱ्या सामन्यात विजयाची नोंद करीत स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीतमध्ये प्रवेश केला आहे.
विदित गुजराथी याने प्रतिष्ठेच्या बुद्धिबळ वर्ल्ड कपमध्ये चौथ्या फेरीपर्यंत दमदार वाटचाल करीत आणि अमेरिकन प्रतिस्पर्ध्याला नमवत पाचव्या फेरीत प्रवेश केला होता. त्यानंतर पाचव्या फेरीत रविवारी रात्री झालेल्या सामन्यात विदितला पांढऱ्या सोंगट्यांसह खेळताना वॅसिफ यांच्यासमवेत बरोबरी मान्य करावी लागली होती. दुसऱ्या डावातील या विजयामुळे विदितने अव्वल ८ खेळाडूंमध्ये स्थान पटकावले आहे. रविवारच्या दुसऱ्या डावात विदितने रॉयलोपेज पद्धतीने ओपनिंग करीत दमदार सुरुवात केली. या सामन्यात विदितने ३८व्या चालीतच विजय मिळवल्याने त्याला उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळवणे शक्य झाले आहे. विदितचे सध्याचे रेटिंग २७२६ असून, पुढील फेरीत कुणाबरोबर लढत होणार ते अन्य लढतींमधील जय-पराजयानंतरच निश्चित होणार आहे.
फोटो
२५विदित