कुत्र्यांचा विषय गल्लीपासून दिल्लीपर्यंत चर्चेत आहे. सुप्रीम कोर्टाने कुत्र्यांना सोडण्याचे आदेश दिले आणि कुत्र्याच्या दादागिरीचा एक व्हिडीओ समोर आला. ही घटना घडलीये नाशिक जिल्ह्यातील निफाडमध्ये. शिकारीच्या शोधात असलेल्या एका बिबट्याची कुत्र्याने इतकी वाईट अवस्था केली की शिकारीसाठी आलेला बिबट्या कसा बसा जीव वाचवून पळून गेला. हा व्हिडाओ प्रचंड व्हायरल होत असून, कुत्र्याच्या धाडसाचीही चर्चा होत आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
कुत्र्याने बिबट्याला चितपट करण्याची घटना नाशिक जिल्ह्यात निफाड तालुक्यात घडली. नांदूर मध्यमेश्वर परिसरात हा थरारक काही ग्रामस्थांना प्रत्यक्ष बघायला मिळाला. काहींनी ही घटना कॅमेऱ्यात कैद केली.
कुत्र्याने बिबट्याला लोळवलं, फरफटतच नेलं
परिसरात असलेल्या गांगुर्डे वस्तीवर बिबट्या आणि कु्त्र्यामधील झुंज रंगली. शिकारीच्या शोधात असलेल्या बिबट्याची कुत्र्याशी गाठ पडली. बिबट्याने कुत्र्यावर हल्ला केला, पण कुत्र्याने बिबट्याच्या तोंडच जबड्यात दाबले. त्यानंतर बिबट्याचा खेळच खल्लास झाला.
बिबट्या कुत्र्यावर वार करण्याचा प्रयत्न करत होता. पण, कुत्र्याने बिबट्याला उठण्याची संधी दिली नाही. कुत्र्याने बिबट्याचे तोंड दाबून धरले आणि फरफटतच तो त्याला घेऊन जात होता. ३०० मीटर फरफटत नेलं.
कुत्र्याच्या तावडीत बिबट्या सापडला, व्हिडीओ बघा
कुत्र्याच्या तावडीतून सुटण्यासाठी बिबट्याने केलं नाटक
कुत्र्या जास्त ताकदवान झाल्याचे दिसल्यानंतर बिबट्याने शरणागती पत्करली. जीव वाचवण्यासाठी मग बिबट्याने मृत झाल्याचे नाटक केले. बिबट्याचा जीव गेला असे समजून कुत्र्याने त्याला सोडला आणि बिबट्या कसा बसा उठून पळत सुटला.
ही घटना सोमवारी घडल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. बिबट्या परिसरात आला होता. त्याचवेळी कुत्र्याने बिबट्याला पकडलं. कुत्र्याच्या हल्ल्यातून बिबट्या पळून गेला. या त्यामुळे जीवित हानी टळली.