VIDEO : बँकामध्ये नोटांचा खडखडाट - देवीदास तुळजापूरकर
By Admin | Updated: November 14, 2016 15:45 IST2016-11-14T15:39:15+5:302016-11-14T15:45:48+5:30
पंतप्रधान बँकांमध्ये नोटाची कमतरता नसल्याचे सांगतात, मात्र अनेक बँकांमध्ये नोटा नसल्याची टीका देवीदास तुळजापूरकरांनी केली

VIDEO : बँकामध्ये नोटांचा खडखडाट - देवीदास तुळजापूरकर
ऑनलाइन लोकमत
नाशिक, दि. १४ - पंतप्रधान, अर्थमंत्री व आरबीआयचे गव्हर्नर मीडियासमोर बँकांमध्ये नोटाची कमतरता नसल्याचे सांगतात. मात्र माझ्या शाखेत नोटांचा खडखडाट आहे. मग नोटा कुठे आहेत याचे काही उत्तर नसल्याची परखड टीका अखिल भारतीय बँक कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस देवीदास तुळजापूरकर यांनी केली. बँक ऑफ महाराष्ट्रच्या दहाव्या द्विवार्षिक अधिवेशनात बोलताना त्यांनी सरकारच्या धोरणावर टीका केली