VIDEO : नाशिक : विविध मागण्यांसाठी ज्येष्ठ नागरिकांचे रास्ता रोको आंदोलन

By Admin | Updated: August 16, 2016 13:12 IST2016-08-16T12:44:09+5:302016-08-16T13:12:06+5:30

जेष्ठ नागरिकांच्या विविध प्रलंबित मागण्या पूर्ण कराव्या यासाठी दिंडोरी येथे जेष्ठ नागरिक संघातर्फे मंगळवारी रास्ता रोको आंदोलन केले

VIDEO: Nashik: Stop the path of senior citizens for various demands | VIDEO : नाशिक : विविध मागण्यांसाठी ज्येष्ठ नागरिकांचे रास्ता रोको आंदोलन

VIDEO : नाशिक : विविध मागण्यांसाठी ज्येष्ठ नागरिकांचे रास्ता रोको आंदोलन

ऑनलाइन लोकमत
दिंडोरी (नाशिक), दि. १६ -  जेष्ठ नागरिकांच्या विविध प्रलंबित मागण्या पूर्ण  कराव्या यासाठी दिंडोरी येथे जेष्ठ नागरिक संघातर्फे मंगळवारी रास्ता रोको आंदोलन केले .
दिंडोरी तालुका जेष्ठ नागरिक संघातर्फे  जेष्ठ नागरिकांचे विविध हक्क प्रश्न समस्या सोडविण्यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरु आहे. यापूर्वी विविध आंदोलने करण्यात आली मात्र फक्त आश्वासने मिळाली परंतु त्याची अंमलबजावणी झाली नाही. सरकारने आश्वासने पाळली नाही त्यामुळे जेष्ठ नागरिकांनी आपले प्रश्न सोडविण्यासाठी मंगळवार दि 16 रोजी   जेलभरो आंदोलन करण्याचा निर्णय घेत  पालखेड चौफुलीवर रास्ता रोको करत घोषणाबाजी केली. प्रत्येक जेष्ठास 5000 मासिक पेन्शन महागाई भत्याशी  निगडित मिळावे,संपूर्ण आरोग्य सुविधा मोफत मिळवल्या,जेष्ठांना वार्ड निहाय विरंगुळा केंद्र करमणुकीचे साधने मिळावी आदी विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले. यात अध्यक्ष शंकरराव वडजे,उपाध्यक्ष सन्तु मोरे आदिनस जेष्ठ नागरिक सहभागी झाले..

Web Title: VIDEO: Nashik: Stop the path of senior citizens for various demands

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.