VIDEO - एम.एस. गोसावी यांचा नाशिक भूषण पुरस्काराने गौरव

By Admin | Updated: May 13, 2017 22:05 IST2017-05-13T21:54:30+5:302017-05-13T22:05:06+5:30

ऑनलाइन लोकमत नाशिक, दि. 13 - गोखले एज्युकेशन सोसायटीचे सचीव तथा प्राचार्य एम.एस. गोसावी यांना स्वामी स्वरुपानंद सरस्वती यांच्या ...

VIDEO - M.S. Gausavi's Nashik Bhushan Award honors Gaurav | VIDEO - एम.एस. गोसावी यांचा नाशिक भूषण पुरस्काराने गौरव

VIDEO - एम.एस. गोसावी यांचा नाशिक भूषण पुरस्काराने गौरव

ऑनलाइन लोकमत
नाशिक, दि. 13 - गोखले एज्युकेशन सोसायटीचे सचीव तथा प्राचार्य एम.एस. गोसावी यांना स्वामी स्वरुपानंद सरस्वती यांच्या हस्ते नाशिक भूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.नाशिक येथील डॉ. कुर्तकोटी सभागृहात हा पुरस्कार सोहळा पार पडला. 11 हजार रुपये रोख, मानपक्ष व स्मृतीचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. 
रोटरी क्लब ऑफ नाशिकतर्फे याविविध क्षेत्रत उल्लेखनीय कामगिरी करून नाशिक शहराच्या नावलौकिकात भर घालणा:या व्यक्तींना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. यावेळी गोसावी यांच्यासह सौ. सुनंदा गोसावी यांचाही गौरव करण्यात आला.  
या पुरस्कार वितरण सोहळ्य़ासाठी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू इ वायुनंदन यांच्यासह पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष  डॉ. भाऊसाहेब मोरे, रोटरी क्लबचे अध्यक्ष अनील सुकेनकर, सचीव राधेय येवले, मिलिंद देशपांडे आदि उपस्थित होते.
https://www.dailymotion.com/video/x844z3w

Web Title: VIDEO - M.S. Gausavi's Nashik Bhushan Award honors Gaurav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.