VIdeo : नाशिकमध्ये मान्सूनचे दमदार आगमन
By Admin | Updated: June 14, 2017 21:07 IST2017-06-14T17:59:42+5:302017-06-14T21:07:14+5:30
ऑनलाइन लोकमत नाशिक, दि. 14 - शहरात आज दुपारी पावणे पाच वाजेच्या सुमारास पावसाने जोरदार हजेरी लावली . सुमारे ...

VIdeo : नाशिकमध्ये मान्सूनचे दमदार आगमन
ऑनलाइन लोकमत
नाशिक, दि. 14 - शहरात आज दुपारी पावणे पाच वाजेच्या सुमारास पावसाने जोरदार हजेरी लावली . सुमारे वीस मिनिटांपासून पाऊस जोरदार सुरू आहे . रस्त्यांवरून पाण्याचे पाट वाहू लागले आहे . मान्सून सरींचा जोरदार वर्षाव होऊ लागल्याने नाशिककर बळीराजाला दिलासा मिळाला आहे . मशागतीची कामे वेगात सुरू असताना हा पाऊस वेळेवर आला असून शेतीसाठी हा पाऊस पोषक ठरणार आहे . शहरासह उपनगरीय भागात ही पाऊस जोरदार सुरू असून ग्रामीण नाशिकमध्ये ही दमदार सरी कोसळू लागल्या आहेत . मुसळधार पावसामुळे व्यापारी संकुल, रहिवासी सोसायटींचे वाहनतळ तरण तलाव बनले आहेत, तसेच जोरदार पावसाने भुयारी गटारी ओव्हर फ्लो झाले आहेत.
https://www.dailymotion.com/video/x845440