VIDEO - अपंग ‘अब्दुल’ देतोय व्यायामाचे धडे!

By Admin | Updated: September 5, 2016 16:11 IST2016-09-05T16:11:37+5:302016-09-05T16:11:37+5:30

जिद्द, चिकाटी असल्यास मनुष्य कोणत्याही अडचणीवर सहज मात करु शकतो याचे जिवंत उदाहरण म्हणजे अपंग अब्दुल होय.

VIDEO - Lessons of Exercise 'Abduction' Abdul! | VIDEO - अपंग ‘अब्दुल’ देतोय व्यायामाचे धडे!

VIDEO - अपंग ‘अब्दुल’ देतोय व्यायामाचे धडे!

style="text-align: justify;">शंकर वाघ/ शिरपूर जैन, ऑनलाइन लोकमत 
शिरपूर, दि. ५ - जिद्द, चिकाटी असल्यास मनुष्य कोणत्याही अडचणीवर सहज मात करु शकतो याचे जिवंत उदाहरण म्हणजे अपंग अब्दुल होय. ४ वर्षाचा असतांनाचा पोलिओमुळे दोन्ही पाय अपंग झाले असले तरी स्वत:हातील आत्मविश्वास गमावून न बसता हिंमतीने उभा राहून आपली एक आगळी-वेगळी ओळख निर्माण केली. परिसरातील धडधाकट युवकांना व्यायामाचे धडे देण्याचे कार्य तो करतांना दिसून येत आहे.
 
मालेगाव तालुक्यातील जैनाची काशी म्हणून प्रसिध्द असलेल्या शिरपूर जैन येथून ११ किलोमिटर अंतरावर असलेल्या ग्राम तिवळी  येथील शे. अब्दुल शे. अबरार हा २२ वर्षिय युवक दोन्ही पायाने अपंग आहे. ४ वर्षाचा असतांनाच पोलिओमुळे त्याचे दोन्ही पाय ७० टक्के बाधित झाले.  
 
अतिशय गरीब परिस्थितीत जीवन जगणा-या या अब्दुलकडे मात्र प्रशासनाचे साफ दुर्लक्ष आहे. अशातही त्याने खचून न जाता तब्बल ७० युवकांना व्यायामाचे धडे देवून आपला उदरनिर्वाह करतो आहे. स्वत: ७० ते ७५ किलो वजन (वेट) उचलतो. घरची परिस्थिती हलाखीची असल्याने व त्याची आई रोजंदारीने मजुरी करुन आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहे. 
 
दहा बाय दहा च्या टिनपत्र्याच्या खोलीत तो युवकांना व्यायामाचे धडे देत आहे. व्यायामाबद्दल त्याला आवड असल्याने त्याने अनेक पारितोषिकेही प्राप्त केले आहेत. अमरावती विभागीय अपंगाच्या रेसींगमध्ये त्याने पहिला क्रमांक सुध्दा मिळविला आहे. राज्यस्तरिय सायकल रेसिंगमध्ये सुध्दा तिसरा क्रमांक प्राप्त केला आहे. तसेच २०१३ मध्ये झालेल्या आय.टी.आय मार्फत चित्रकला स्पर्धेत सुध्दा अमरावती विभागातून दुसरा येण्याचा बहुमान त्याने पटकविला आहे. 
 
मनुष्यात जिद्द व चिकाटी असल्यास तो कोणतेही शिखर गाठू शकते हे अब्दुलने केलेल्या कार्यावरुन दिसून येते. असे असले तरी प्रशासनाच्यावतिने त्याला आर्थीक मदतीची अपेक्षा असताना आजपर्यंत मिळू शकली नाही याची त्याला खंत आहे.मी अपंग असलो तरी अपंगात्वावर मात करीत मला जे शक्य ते मी मिळविण्याचा प्रयत्न करीत आहे. गावात सुसज्ज व्यायाम शाळा , सर्व साहित्य उपलब्ध करुन युवकांना व्यायामाकडे वळविण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न करावेत -  अब्दुल 

Web Title: VIDEO - Lessons of Exercise 'Abduction' Abdul!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.