VIDEO : टीचभर पोटासाठी दिव्यांगाचे अंगाला फटके

By Admin | Updated: January 6, 2017 12:59 IST2017-01-06T12:10:05+5:302017-01-06T12:59:01+5:30

(रामदास शिंदे), ऑनलाइन लोकमत पेठ (नाशिक), दि. ६ -  दुपारचे तळपणारे ऊन, तापलेले रस्ते,पेठ शहराचा भरलेला्या बाजाराचा कोलाहाल या ...

VIDEO: Divorced lungs for the whole body | VIDEO : टीचभर पोटासाठी दिव्यांगाचे अंगाला फटके

VIDEO : टीचभर पोटासाठी दिव्यांगाचे अंगाला फटके

(रामदास शिंदे), ऑनलाइन लोकमत
पेठ (नाशिक), दि. ६ -  दुपारचे तळपणारे ऊन, तापलेले रस्ते,पेठ शहराचा भरलेला्या बाजाराचा कोलाहाल या गर्दीचा छेद करीत ढोलकीच्या तालावर आपल्या अपंगत्वार मात करून स्वतःच्या अंगावर चाबकाचे फटके मारून एकेक रुपया जमा करणाऱ्या पोतराजाची जगण्याची परवड कधी दूर होईल असा सवाल ऊभा ठाकतो.
 आपल्या नशिबी आलेल्या दारिद्रय, अपंगत्व अथवा आर्थिक परिस्थितीशी झगडत असताना अनेकजण खचलेले आपणास दिसून येत असतात. मात्र अशोक तेलगू हा साधारण 35 वर्षाचा दिव्यांग नवयुवक दारिद्रयात खितपत पडलेल्या आपल्या फाटक्या संसाराला ठिगळ लाऊन टिचभर पोटाची खळगी भरण्यासाठी पोतराजाचा चाबूक हाती घेतला. रंगीबेरंगी चिंध्या, कंबरेला व पायात घुंगरू, कपाळावर मरट भरून एका पायाने अपंग असतांनाही गावोगाव भर ऊन्हात पत्नी वाजवत असलेल्या ढोलच्या तालावर गिरक्या घेत स्वतःला चाबकाचे फटके मारून एक -दोन रुपये जमा करतात. दिवसभरात जमा झालेल्या शे- दोनशे रूपयातून संसाराचा गाडा ओढत असल्याचे अशोकची पत्नी सांगते. तर वाढत्या महागाईमुळे शिवाय पोतराजकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टीकोन बदलल्यामुळे परंपरेने सुरु झालेला हा व्यवसाय पुढे चालवणे जिकीरीचे होत चालले असल्याची खंत अशोकने व्यक्त करून दाखवली. अतिशय खडतर परिस्थितीत अपंगत्वावर मात करून संसाराचा गाडा ओढणाऱ्या अशोकने शासनाने आमच्याकडे लक्ष देऊन किमान निवासापुरते घर व लेकरा बाळांना शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून द्यावी अशी माफक अपेक्षा व्यक्त करताना सरकारने आम्हाला आजवर काय दिले असा प्रश्न विचारुन अशोकने सर्वच बघ्यांना निरुतर केले. 
 

https://www.dailymotion.com/video/x844nfc

Web Title: VIDEO: Divorced lungs for the whole body

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.