VIDEO : ‘डिव्हाईन सायक्लोथॉन : दिव्यांगांप्रती स्नेहभाव

By Admin | Updated: February 14, 2017 18:46 IST2017-02-14T16:50:34+5:302017-02-14T18:46:32+5:30

नाशिक : समाजातल्या दिव्यांगांप्रती सर्वसामान्य नागरिकांमध्ये स्नेहभाव निर्माण व्हावा, या उद्देशाने नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लार्इंड व नाशिक सायकलिस्टच्या ...

VIDEO: 'Device cyclothon: loving affection for the lord | VIDEO : ‘डिव्हाईन सायक्लोथॉन : दिव्यांगांप्रती स्नेहभाव

VIDEO : ‘डिव्हाईन सायक्लोथॉन : दिव्यांगांप्रती स्नेहभाव

नाशिक : समाजातल्या दिव्यांगांप्रती सर्वसामान्य नागरिकांमध्ये स्नेहभाव निर्माण व्हावा, या उद्देशाने नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लार्इंड व नाशिक सायकलिस्टच्या वतीने आज व्हॅलेंटाईन डेनिमित्त ‘डिव्हाईन सायक्लोथॉन’चे आयोजन करण्यात आले होते.
नाशिकमध्ये सलग दुसऱ्यांदा असा उपक्रम राबविण्यात आला. या सायक्लोथॉनमध्ये सुमारे शंभराहून अधिक दृष्टिबाधितांसह दिव्यांग व विशेष मुलामुलींना सहभाग नोंदविले. यावेळी दोन चाकी सायकल, टॅण्डम सायकल, बालकांसाठी तीनचाकी सायकल तसेच व्हिलचेअर आदिंचा समावेश होता. सहभागी सर्वच दिव्यांगांचा उत्साह वाखाण्याजोगा होता.
पोलीस आयुक्त रविंद्रकुमार सिंघल, उपआयुक्त विजय पाटील, क्रिडा मानसोपचार तज्ज्ञ भीष्मराज बाम, दृष्टीबाधित उद्योजक भावेश भाटिया, बॅँक अधिकारी वैभव पुराणिक, ज्ञानगंगा संस्थेचे राजेश शुक्ल, नॅबचे अध्यक्ष रामेश्वर कलंत्री यांच्यासह नाशिक सायकलिस्टचे सदस्य प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
महात्मानगर क्रिकेट मैदानापासून सायक्लोथॉनला प्रारंभ करण्यात आला. जेहान सर्कलवर समारोप करण्यात आला.

 

https://www.dailymotion.com/video/x844r3n

Web Title: VIDEO: 'Device cyclothon: loving affection for the lord

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.