नवी शेमळी सोसायटीत ‘परिवर्तन’चा विजय
By Admin | Updated: November 11, 2015 22:37 IST2015-11-11T22:36:56+5:302015-11-11T22:37:49+5:30
नवी शेमळी सोसायटीत ‘परिवर्तन’चा विजय

नवी शेमळी सोसायटीत ‘परिवर्तन’चा विजय
मालेगाव : बागलाण तालुक्यातील नवी शेमळी सोसायटीच्या निवडणुकीत परिवर्तन व शेतकरी विकास पॅनल यांच्यात १३ जागांसाठी लढत होऊन परिवर्तन पॅनलने विजय मिळविला.
निवडणुकीत सोसायटीचे माजी चेअरमन केदा वाघ यांच्या शेतकरी विकास पॅनलला तीन, तर माजी चेअरमन प्रताप देवरे यांच्या परिवर्तन पॅनलला दहा जागा मिळाल्या. केदा वाघ व पुंजाराम वाघ यांना समान (५७) मते मिळाली होती. परिणामी लकी ड्रॉ सोडतद्वारे निवड करण्यात आली. त्यात केदा वाघ विजयी झाले. विजयी उमेदवारांत कासूबाई वाघ, सुशीला वाघ, शांताराम बधान, शिवाजी जाधव, केवळ जाधव, दिलचंद वाघ, रामदास शिंदे, केदा वाघ, लक्ष्मण वाघ, अरुण सूर्यवंशी, संतोष खैरनार, दत्तात्रेय खांडेकर यांचा समावेश आहे. वीस वर्षांपासून राजकारणात असलेले बळीराम पाटील यांना प्रथमच पराभव पत्करावा लागला. (प्रतिनिधी)