शहरं
Join us  
Trending Stories
1
कोव्हिशिल्ड साईड इफेक्ट: दोन मृत मुलींचे पालक सीरम इन्स्टिट्यूटला कोर्टात खेचणार
2
ठाकरे गटाला पॉर्न संस्कृती रुजवायची आहे का? चित्रा वाघ यांचा हल्लाबोल
3
"ज्या बूथवर काँग्रेसला एक मतही मिळणार नाही, तिथे 25 लाखांची विकासकामं केली जातील"
4
Rahul Gandhi : "न रहेगा बांस, न बजेगी बांसुरी म्हणजे सरकारी नोकऱ्या नाहीत, आरक्षण नाही"; राहुल गांधींचा घणाघात
5
उद्धव ठाकरेंनी मागितली संभाजीराजेंची माफी; "आम्ही शेण खाल्लं म्हणून तुम्ही..."
6
Lok Sabha Election 2024: लोकसभेला 'मविआ' किती जागा जिंकणार? विधानसभा निवडणुकीत काय घडणार? Jayant Patil यांनी केले २ मोठे दावे
7
Health Tips: उन्हाळ्यात प्रकृती थंड ठेवण्यासाठी आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकरांनी सांगितला SST फॉर्म्युला!
8
मनसे नेते अमित ठाकरेंचं शालेय शिक्षणमंत्र्यांना पत्र; RTE प्रवेश प्रक्रियेवरून नाराजी
9
'देशात काँग्रेस संपत असताना पाकिस्तानला रडू येतंय'; व्होट जिहादवरुन मोदींचा निशाणा
10
कोव्हिशील्ड घेतलेल्यांना सर्वात महत्वाची गोष्ट सांगायची राहूनच गेली! रवी गोडसेंनी सांगितला पुढचा 'धोका...'
11
Guru Asta 2024: गुरु अस्त काळात होणार राजकीय उलथापालथ? मंगल कार्य वर्ज्य? वाचा उपाययोजना!
12
Gold Price Today: सोन्याच्या किंमतीत झाली मोठी घसरण, ७५००० च्या उच्चांकावरून ७१००० रुपयांवर आलं गोल्ड
13
Goldy Brar Murder : गोल्डी ब्रारच्या हत्येची बातमी अफवा; अमेरिकन पोलिसांनी केले स्पष्ट
14
कोकणात दादा आणि भाईंचं मनोमीलन कसं झालं? खुद्द केसरकर यांनीच सांगितली 'इनसाईड स्टोरी'   
15
ब्रिजभूषण यांचे पुत्र करण भूषण सिंह यांना भाजपा तिकीट देणार, सूत्रांची माहिती
16
Uma Bharti : "काँग्रेसने सत्ता मिळवण्यासाठी देशाचे विभाजन केले"; उमा भारतींची राहुल-सोनिया गांधींवर टीका
17
अहो आश्चर्यम्! मारुतीच्या नव्या स्विफ्टला मिळाली ४ स्टार सेफ्टी रेटिंग; जपानमध्ये क्रॅश टेस्ट
18
Multibagger Stock : सलग तिसऱ्या दिवशी 'या' कंपनीच्या शेअरला अपर सर्किट; वर्षभरापासून करतोय मालामाल
19
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : भाजपचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण अपक्ष निवडणूक लढवणार
20
'अस्वस्थ झाला असतात तर ८४ वर्ष जगला नसता';नारायण राणेंचं शरद पवारांना प्रत्युत्तर

युतीच्या विजयाने समर्थकांचा जल्लोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2019 1:32 AM

लोकसभा निवडणूक मतदान मतमोजणी प्रक्रिया सुरू झाल्यानंतर जसेजसे पहिल्या-दुसऱ्या फेरीचे निकाल जाहीर होऊ लागले तसतसे परिसरातील हमरस्त्यावरील वर्दळ कमी झाली होती.

नाशिकरोड : लोकसभा निवडणूक मतदान मतमोजणी प्रक्रिया सुरू झाल्यानंतर जसेजसे पहिल्या-दुसऱ्या फेरीचे निकाल जाहीर होऊ लागले तसतसे परिसरातील हमरस्त्यावरील वर्दळ कमी झाली होती. तर शिवसेना-भाजपा युतीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसत होते. हेमत गोडसे विजयाकडे वाटचाल करत असताना शहरात ठिकठिकाणी फटाके फोडण्यात येत होते. तसेच पेढे वाटून गुलालाची उधळण करण्यात आली.लोकसभा निवडणूक मतदानानंतर कोण विजयी होणार, कोणाची सत्ता येणार याबाबत सर्वांची उत्कंठा शिगेला पोहोचली होती. त्यामुळे गेल्या महिन्यापासून सर्वत्र विजय-पराजयाचीच चर्चा सुरू होती.गुरुवारी सकाळी लोकसभा निवडणुकीची मतमोजणी प्रक्रिया सुरू झाल्यानंतर पहिल्या-दुसºया फेरीचे निकाल जाहीर होण्यास सुरुवात झाली. दुपारी साडेअकरा वाजेनंतर देशातील चित्र आणखी स्पष्ट होण्यास सुरुवात झाल्याने युतीच्या कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले. व्यापारी पेठेतदेखील मतमोजणीचा फिव्हर बघायला मिळाला. नाशिकरोड येथे दुपारपासून निवडणुकीचे वातावरण होते.नासर्डी ते पाथर्डी आनंदोत्सवइंदिरानगर : लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना महायुतीला मिळालेल्या घवघवीत यशाबद्दल नासर्डी ते पाथर्डी या परिसरात फटाक्यांची आतषबाजी करून आणि पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.गेल्या एक महिन्यात टप्प्याटप्प्यात लोकसभा निवडणुकीचे मतदान झाले. त्याची मतमोजणी आज गुरु वार (दि.२३) रोजी सकाळी ८ वाजेपासून सुरु वात झाली. जसजसे निकाल महायुतीच्या बाजूने वाढू लागले तसतसे शिवसेना व भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष निर्माण झाला. नासर्डी ते पाथर्डी यामध्ये प्रभाग २३ मध्ये भाजपाचे चार नगरसेवक, प्रभाग ३० मध्ये भाजपचे चार नगरसेवक आणि प्रभाग क्र मांक ३१ मध्ये शिवसेनेचे दोन नगरसेवक व भाजपचे दोन असे एकूण बारा नगरसेवक आहेत त्यामुळे दुपारपासूनच भाजप-शिवसेनेच्या वतीने आनंदोत्सव साजरा करण्यास सुरु वात झाली होती. सायंकाळ होताच जल्लोषात अजून वाढ झाली होती. परिसरातील मिठाईच्या दुकानात पेढ्यांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढलेली दिसून आली. इंदिरानगर, राजीवनगर, दिपालीनगर, राणेनगरसह परिसरात सर्वत्र चौकाचौकांमध्ये फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.विविध संपर्क कार्यालयात गर्दीनासर्डी ते पाथर्डी भाजपा-शिवसेनेचे नगरसेवक असल्याने या दोन्ही पक्षाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. प्रभागातील प्रत्येक नगरसेवकाने सायंकाळ होताच आपल्या संपर्ककार्यालयावर फटाक्यांची आतषबाजी व पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला.४विविध संपर्क कार्यालयात आनंदोत्सव साजरा करण्यात आला. विशेषत: भाजपा नगरसेवक सतीश कुलकर्णी, सतीश सोनवणे, डॉ. दीपाली कुलकर्णी, श्याम बडोदे, चंद्रकांत खोडे, सुप्रिया खोडे, रूपाली निकुळे, भगवान दोंदे, पुष्पा आव्हाड, शाहिन मिर्झा, शिवसेना नगरसेवक सुदाम डेमसे, संगीता जाधव यांच्या संपर्क कार्यालयात आनंदोत्सव साजरा करण्यात आला.सिडको परिसरात पेढे वाटप करून विजयाचा जल्लोषसिडको : भारतीय जनता पार्टीने राज्यात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात लोकसभा निवडणुकीत घवघवीत यश संपादन केल्याबद्दल आमदार सीमा हिरे यांच्या संपर्क कार्यालयासमोर ढोलताशांच्या गजरात नाचत गाजत पेढे वाटप करून विजयाचा जल्लोष साजरा करण्यात आला.यावेळी सीमा हिरे, नगरसेवक छाया देवांग, प्रतिभाताई पवार, भाग्यश्री ढोमसे, सिडको मंडल अध्यक्ष बाळासाहेब पाटील, महेश हिरे, जगन अण्णा पाटील, नगरसेवक भगवान दोंदे, मनोज बिरार, रवींद्र पाटील, गणेश ठाकूर, प्रकाश चकोर सुहास देशपांडे, माधवी मोराणकर, निर्मला पाटील, कृष्णा धोंडगे, गणेश अरिंगळे, एकनाथ नवले, अशोक पवार, डी. डी. राजपूत, अविनाश पाटील, अनिल कासार, प्रवीण सोनवणे, डॉ. गोपाल सिसोदे, डॉ. वैभव महाले, नवनाथ पारखे, वासंती जावळे, डॉ. मनीषा दराडे, रश्मी हिरे, ऋचा हिरे आदी उपस्थित होते. यावेळी सीमा हिरे यांनी सांगितले की, हा जनतेचा व विकासाचा विजय आहे. प्रचंड मताधिक्क्याने निवडून दिल्याने जनतेचे आभार मानते.

टॅग्स :Lok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकालnashik-pcनाशिक