मालेगावी माजी सैनिक संघटनेतर्फे विजय दिन साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2020 00:15 IST2020-07-26T21:35:54+5:302020-07-27T00:15:26+5:30
मालेगाव : येथे एकविसाव्या कारगिल विजय दिनानिमित्त येथील श्रीरामनगर भागातील राष्ट्रीय हुतात्मा स्मारक येथे मालेगाव तालुका माजी सैनिक संघटनेच्यावतीने विजय दिन साजरा करण्यात आला.

मालेगावी माजी सैनिक संघटनेतर्फे विजय दिन साजरा
मालेगाव : येथे एकविसाव्या कारगिल विजय दिनानिमित्त येथील श्रीरामनगर भागातील राष्ट्रीय हुतात्मा स्मारक येथे मालेगाव तालुका माजी सैनिक संघटनेच्यावतीने विजय दिन साजरा करण्यात आला.
यावेळी राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते हुतात्मा स्मारकाला पुष्पचक्र अर्पण करून शहिदांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी संघटनेचे अध्यक्ष लोटन शेवाळे उपाध्यक्ष निंबा निकम जनरल सेक्रेटरी दिलीप अहिरे यांनी संघटनेच्यावतीने पुष्पचक्र अर्पण करुन मानवंदना दिली. नगरसेवक राजाराम जाधव राजेश गंगावणे, रामभाऊ मिस्तरी, निखिल पवार, देवा पाटील, माजी सैनिक गोकुळ पवार, माधव बोरसे, सुरेश शेवाळे, यशवंत नेरकर, संजय अहिरे, गोरख खैरे आदी उपस्थित होते.