शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

विजयी महिलांनी केला ग्रामविकासाचा निर्धार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 00:57 IST

नाशिक : ग्रामविकासाच्या दृष्टिने महत्त्वाचे माध्यम मानल्या जाणाऱ्या ग्रामपंचायतीच्या यंदाच्या निवडणूकीत ५० टक्क्याहून अधिक महिला विजयी झाल्याने गावगाडा हाकण्यासाठी पुरुषांच्या बरोबरीने त्यादेखील कारभारी ठरल्या आहेत.

ठळक मुद्देयंदाच्या निवडणूकीत युवा वर्गाचा सहभाग सर्वाधिक

नाशिक : ग्रामविकासाच्या दृष्टिने महत्त्वाचे माध्यम मानल्या जाणाऱ्या ग्रामपंचायतीच्या यंदाच्या निवडणूकीत ५० टक्क्याहून अधिक महिला विजयी झाल्याने गावगाडा हाकण्यासाठी पुरुषांच्या बरोबरीने त्यादेखील कारभारी ठरल्या आहेत.जिल्ह्यात ५६५ ग्रामपंचायतींमध्ये ४२२९ जागांसाठी झालेल्या निवडणूकीत ११ हजार ५६ उमेदवारांनी नशीब आजमावले. यावेळच्या निवडणूकीत युवा वर्गाचा सहभाग मोठ्या प्रमाणात दिसून आला. विशेष म्हणजे पुरुषांहून अधिक महिला विजयी झाल्याचे दिसून आले. यात २५३७ महिलांनी ग्रामपंचायतीत प्रवेश केला असून ग्रामविकासासाठी योगदान देण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला आहे.ग्रामपंचायत निवडणूकीचा लेखाजोखानिवडणूका झालेल्या ग्रामपंचायती५६५निवडून आलेले उमेदवार४२२९ग्रा.पं. निवडणुकीत विजयी महिला उमेदवार२५३७

सिन्नर तालुक्यात महिलांचे वर्चस्वसिन्नर तालुक्यात १०० ग्रामपंचायतींच्या निवडणूका पार पडल्या. यात सर्वाधिक ५६० महिला उमेदवार विजयी झाल्या. या तालुक्यात मुसळगाव ग्रामपंचायतीमध्ये सर्वात जास्त ९ तर मुसळगाव ग्रामपंचायतीत ८ महिला उमेदवार विजयी झाला. पहिल्यांदाच महिला इतक्या मोठ्या संख्येने रिंगणात उतरल्या होत्या.

ग्रामपंचायत निवडणूकीचा लेखाजोखानिवडणूका झालेल्या ग्रामपंचायती५६५निवडून आलेले उमेदवार४२२९ग्रा.पं. निवडणुकीत विजयी महिला उमेदवार२५३७

सिन्नर तालुक्यात महिलांचे वर्चस्वसिन्नर तालुक्यात १०० ग्रामपंचायतींच्या निवडणूका पार पडल्या. यात सर्वाधिक ५६० महिला उमेदवार विजयी झाल्या. या तालुक्यात मुसळगाव ग्रामपंचायतीमध्ये सर्वात जास्त ९ तर मुसळगाव ग्रामपंचायतीत ८ महिला उमेदवार विजयी झाला. पहिल्यांदाच महिला इतक्या मोठ्या संख्येने रिंगणात उतरल्या होत्या.विजयी महिला उमेदवारांच्या प्रतिक्रियागावातील पिण्याचा पाण्याचा तसेच स्वच्छतेचा प्रश्न मार्गी लावण्यावर भर देणार आहे. तसेच बचतगटाच्या माध्यमातून महिलांना सक्षमीकरण व आर्थिक सशक्तीकरण करण्यासाठी जोड व्यवसाय उभा करुन आर्थिक दुर्बलता दूर करण्याचे ध्येय डोळ्यासमोर ठेवले आहे.- पुजा आहेर, ग्रामपंचायत, न्यायडोंगरी.

गाव समस्यामुक्त तसेच सर्वगुणसंपन्न करण्याचे ध्येय मी डोळ्यासमोर ठेवले आहे. मतदारांनी टाकलेला विश्वास सार्थ ठरविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करणार आहे. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावास विकास घडवून आणणे हिच माझ्या विजयाची पावती असेल.- ज्योतीताई मोगल, ग्रामपंचायत, लखमापूर.

कनाशी गावातील श्रीराम मंदिराचा जीर्णोद्धार करुन तीर्थक्षेत्र विकास निधीतून परिसराचा विकास करणार असून गावात नवीन नळ पाणीपुरवठा योजनासह गावांतर्गत रस्ते विकासाला प्राधान्य देणार, महिला बचत गटांना अर्थसहाय्य मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार सांस्कृतिक भवनची निर्मिती करुन मंगल कार्यालयाचे सुशोभिकरण करणार.- वैशाली शिरसाठ, ग्रामपंचायत, कनाशी.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूक