शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

अनधिकृत स्पीड ब्रेकरने घेतला कामगाराचा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2018 15:18 IST

रेस्ट कॅम्प रोडवरील रेणुका देवी मंदिरामागे राहणारे प्रेस कामगार सतीश दत्तात्रय बेलेकर (५७) हे गुरुवारी रात्री भगूर गावात खासगी कामानिमित्त आले होते. काम आटोपून रात्री १०.३० ते ११ वाचेच्या दरम्यान आपली दुचाकी (एमएच १५ इएफ ४२१७)वरून घरी जात

भगूर : येथील मारवाडी गल्लीतील गतिरोधकावरून गुरुवारी रात्री पडून गंभीर जखमी झालेल्या प्रेस कामगाराचा रविवारी सायंकाळी खासगी रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाला. बेकायदेशीरपणे उभारण्यात आलेल्या गतिरोधकाने एका नागरिकांचा बळी घेतल्याने जनमानसात संतापाची लाट उसळली आहे.रेस्ट कॅम्प रोडवरील रेणुका देवी मंदिरामागे राहणारे प्रेस कामगार सतीश दत्तात्रय बेलेकर (५७) हे गुरुवारी रात्री भगूर गावात खासगी कामानिमित्त आले होते. काम आटोपून रात्री १०.३० ते ११ वाचेच्या दरम्यान आपली दुचाकी (एमएच १५ इएफ ४२१७)वरून घरी जात असताना मारवाडी गल्लीतील सुराणा यांच्या घरासमोरील काँक्रीट रोडवर बेकायदेशीरपणे उभारलेल्या मोठ्या गतिरोधकाचा अंदाज न आल्याने सतीश बेलेकर यांचे वाहन आदळून खाली पडले. या अपघातात त्यांच्या मेंदूस मार बसल्याने ते रक्तस्राव होऊन गंभीर जखमी झाले होते. त्यांना पुढील उपचारासाठी नाशिकच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान रविवारी सायंकाळी सतीश बेलेकर यांची प्राणज्योत मालवली. गृहरक्षक दलातही सेवा बजावणाऱ्या बेलेकर यांच्या पश्चात पत्नी, मुलगा-मुलगी असा परिवार आहे. या अपघाती मृत्यूप्रकरणी देवळाली कॅम्प पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.दरम्यान, पालिकेने रस्ते काँक्रीटीकरण केल्यानंतर काही नागरिकांनी आपापल्या गरजेनुसार वाहनांच्या वेगाला आवर घालण्यासाठी उंचच उंच गतिरोधक जागोजागी उभारले. त्याबाबत सूचना देणारे फलक, तसेच गतिरोधकाला काळेपांढरे पट्टे नसल्याने रात्रीच्या अंधारात त्यांचा अंदाज नवोदित वाहनधारकांना येत नसल्याने तेथे वारंवार छोटे-मोठे अपघात होतात. आता हे गतिरोधक नागरिकांच्या जिवावर बेतू लागल्याने वाहनधारक धास्तावले आहेत. पालिकेने याची दखल घेऊन गावातील असे बेकायदेशीर गतिरोधक तत्काळ हटवावे आणि गतिरोधक उभारणाºयावर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी संतप्त गावकºयांनी केली आहे.

टॅग्स :PoliceपोलिसNashikनाशिक