विद्यार्थ्याची सराईत गुन्हेगार खांडवाकडून लूट
By Admin | Updated: August 10, 2016 23:48 IST2016-08-10T23:47:57+5:302016-08-10T23:48:24+5:30
विद्यार्थ्याची सराईत गुन्हेगार खांडवाकडून लूट

विद्यार्थ्याची सराईत गुन्हेगार खांडवाकडून लूट
नाशिक : भावास मारण्याची सुपारी घेतल्याचे सांगून एअरगनचा धाक दाखवून महाविद्यालयीन विद्यार्थ्यास पेठरोडवरील सराईत गुन्हेगार नीलेश अशोक सोनवणे ऊर्फ खांडवा (२६) याने रोकड व पल्सर दुचाकी पळवून नेल्याची घटना मंगळवारी (दि़ ९) सायंकाळी बॉइज टाउन शाळेच्या गेटजवळ घडली़
सौरभ जयवंत गटकळ (२४, रा़ पाटील लेन, कॉलेजरोड, नाशिक) याने सरकारवाडा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार सायंकाळी सव्वासात वाजेच्या सुमारास तो मित्रांसमवेत बॉइज टाउन शाळेच्या प्रवेशद्वारावर गप्पा मारत होते़ त्यावेळी संशयित नीलेश सोनवणे ऊर्फ खांडवा याने त्यास बाजूला बोलावून घेत तुझ्या भावाची सुपारी घेतल्याचे सांगून एअरगनचा धाक दाखविला़ यानंतर गटकळजवळील रोख रक्कम व पल्सर दुचाकी (एमएच १५, इक्यु २१७०) असा ४३ हजार रुपयांचा ऐवज पळवून नेला़
याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात सराईत गुन्हेगार खांडवाविरुद्ध शस्त्राचा धाक दाखवून लूट केल्याचा तसेच जिवे ठार मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ (प्रतिनिधी)