चुरस उपाध्यक्षपदासाठी
By Admin | Updated: July 21, 2014 01:34 IST2014-07-21T01:17:24+5:302014-07-21T01:34:17+5:30
चुरस उपाध्यक्षपदासाठी

चुरस उपाध्यक्षपदासाठी
पहिल्या वर्षीचे अध्यक्षपद मोठ्या उद्योग घटकासाठी असल्याने या पदासाठी तडजोड होऊ शकते; मात्र यावर्षीच्या लघुउद्योग घटकातील उपाध्यक्ष हा पुढील वर्षी अध्यक्ष होणार असल्याने उपाध्यक्षपदासाठीच जास्त चुरस निर्माण झाली आहे. चार उमेदवार निवडणूक रिंगणात असल्याने तिघांची समजूत काढण्यासाठी श्रेष्ठींची दमछाक होणार आहे. इच्छुक उमेदवारांनी आपापल्या पद्धतीने दबावतंत्राचा वापर सुरू केल्याचे समजते.काही सभासदांना निवडणूक लढविण्याची इच्छा नसतानाही त्यांना निवडणूक रिंगणात उतरवून दबावतंत्राचा वापर करण्यात आल्याची चर्चा चर्चिली जात आहे. आता हे उमेदवार आपली उमेदवारी माघार घेण्यास तयार नाहीत. त्यामुळे या उमेदवारांची मनधरणी करण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे.