उपाध्यक्ष-अध्यक्षांचा स्वीय सहायक यांच्यात हमरीतुमरी

By Admin | Updated: September 2, 2014 01:10 IST2014-09-01T22:41:25+5:302014-09-02T01:10:52+5:30

उपाध्यक्ष-अध्यक्षांचा स्वीय सहायक यांच्यात हमरीतुमरी

Vice President-in-chief of the Assistant Assistant | उपाध्यक्ष-अध्यक्षांचा स्वीय सहायक यांच्यात हमरीतुमरी

उपाध्यक्ष-अध्यक्षांचा स्वीय सहायक यांच्यात हमरीतुमरी



नाशिक : जिल्हा परिषदेतील कॉँग्रेस आणि राष्ट्रवादी कॉँग्रेसमधील वाद शिगेला पोहोचला असून, त्याची परिणती सोमवारी (दि. १) उपाध्यक्ष आणि अध्यक्षांचे स्वीय सहायक यांच्यात हमरी-तुमरीच्या प्रकरणात झाली. निधी नियोजनावरूनच हा वाद झाल्याची चर्चा असून, उपाध्यक्षांच्या वादानंतर जिल्हा परिषदेत काही काळ तणावाचे वातावरण होते.
उपाध्यक्ष संपतराव सकाळे यांनी जिल्हा परिषद सेसच्या निधीचे वाटप कसे झाले, याची माहिती कार्यकारी अभियंता सुरेंद्र कंकरेज यांच्याकडे मागितली. त्यानंतर थोड्यात वेळात अध्यक्ष जयश्री पवार यांचे स्वीय सहायक जी. पी. खैरनार यांनी बांधकाम विभाग एकमध्ये जाऊन उपाध्यक्ष संपतराव सकाळे यांची सेसमधून किती कामे मंजूर झाली, याची माहिती घेत त्यानुसार मंजूर असलेल्या सुमारे २४ लाखांच्या नस्ती अध्यक्ष कार्यालयात नेल्याचे या विभागातील एक महिला कर्मचारी व शाखा अभियंता यांची मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर यांनी विचारणा केल्यानंतर स्पष्ट झाले. तत्पूर्वी आपल्या मंजूर कामांच्या नस्ती अध्यक्षांचे स्वीय सहायक घेऊन गेल्याची माहिती मिळताच रागाने जिने उतरत असलेले सकाळे व खैरनार यांची समोरासमोर भेट होताच सकाळे व खैरनार यांच्या शाब्दिक वाद सुरू झाले. वाद वाढतच जाऊन दोघांचे आवाज वाढले. वादाची परिणती शिवीगाळ करण्यापर्यंत होताच संपतराव सकाळे यांना दिलीप पाटील व अन्य दोघांनी उपाध्यक्ष कार्यालयात नेले, तर खैरनार यांना सदस्य यतिन पगार व कर्मचारी युनियनचे पदाधिकारी विजय हळदे, रवि थेटे, रवींद्र देसाई यांनी अध्यक्ष कार्यालयात नेले. घटनेची माहिती मिळताच सभापती राजेश नवाळे, प्रवीण जाधव, सोमनाथ फडोळ, प्रकाश वडजे, रवींद्र देवरे, केरू पवार, पंचायत समिती सभापती अनिल ढिकले यांनी उपाध्यक्षांच्या कक्षात जाऊन माहिती घेतली. त्यानंतर संपतराव सकाळे, सदस्य सोमनाथ फडोळ, अनिल ढिकले, पंचायत समिती सदस्य धनाजी पाटील, विजय थेटे यांनी सुखदेव बनकर यांची भेट घेऊन झाल्या प्रकाराबाबत नाराजी व्यक्त केली.

Web Title: Vice President-in-chief of the Assistant Assistant