शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
3
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
4
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
5
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
6
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
7
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
8
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
9
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
10
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
11
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
12
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
13
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
14
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
15
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
16
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
17
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
18
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
19
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
20
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...

ज्येष्ठ विनोदी साहित्यिक चंद्रकांत महामिने यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 14:15 IST

नाशिक : मराठी साहित्यात निखळ विनोदी साहित्य निर्माण करणाऱ्या मोजक्या साहित्यिकांपैकी एक असलेले ज्येष्ठ साहित्यिक चंद्रकांत महामिने (८७) यांचे रविवारी सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. महामिने यांच्या निधनाने नाशिकच्या साहित्य वर्तुळात शोककळा पसरली .

नाशिक : मराठी साहित्यात निखळ विनोदी साहित्य निर्माण करणाऱ्या मोजक्या साहित्यिकांपैकी एक असलेले ज्येष्ठ साहित्यिक चंद्रकांत महामिने (८७) यांचे रविवारी सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. महामिने यांच्या निधनाने नाशिकच्या साहित्य वर्तुळात शोककळा पसरली .

महामिने यांच्या निधनाने नाशिकच्या साहित्य वर्तुळातील सर्व क्षेत्रात मुसाफिरी केलेला ज्येष्ठ तारा निखळला आहे. महामिने यांनी विनोदी साहित्य, ललितलेखन, नाट्यलेखन, बालकांसाठी कथासंग्रह, व्यंगकाव्ये असे विपुल लेखन केले असून त्यांची शंभरहून अधिक पुस्तके प्रकाशित झाली होती. प्रवराकाठची माणसं, मिस रामपूर बुद्रुक, गंगू आली रे अंगणी, इंद्रलोकी मधुचंद्र, घोडं मेलं येरझऱ्याने, हिसाबनीती, एक दिवसाचा मुख्यमंत्री, मदन बाधा, गावरान ठसका, सखे सोबती, दुसरा मधुचंद्र, सालंकृत प्रेयसीदान यासह त्यांची अनेक पुस्तके गाजली होती. ललित लेखसंग्रहांमध्ये साहित्य पालखीचे बेरके भोई, साहित्याचे स्मगलिंग, असा मी नंदीबैल, हसरी न्याहारी,पक्षांतरामी क्षणे क्षणे, हास्यजत्रेत मी ही विशेष चर्चिली गेली होती. त्याशिवाय नाट्यलेखनाच्या क्षेत्रात त्यांनी कशासाठी ? बेडरुमसाठी !, हे असंच चालायचं आणि बायको झाली बॉस ही नाटके लिहली होती.

त्याशिवाय चार विनोदी एकांकिका आणि बालकांसाठी अनेकोनेक पुस्तके लिहली होती. तसेच ‘खानावळ ते लिहिणावळ’ हे त्यांचे आत्मचरित्रदेखील प्रसिद्ध झाले होते. त्याशिवाय नाशिक आणि जळगाव आकाशवाणीसाठी नभोनाट्य, श्रुतिका आणि वगनाट्ये लिहली होती. सावानाच्या जिल्हा साहित्य संमेलनासह अन्य तालुका संमेलनांचे अध्यक्षपददेखील त्यांनी भुषविले होेते. सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने २०१७ या वर्षी त्यांना ‘जीवनगौरव पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले होते. त्यांना ‘राज्य शासकीय उत्कृष्ट वाड:मय पुरस्कार, केशव वाड्मय पुरस्कार, वि.मा.दी. पटवर्धन पुरस्कार, ताराबाई मोडक पुरस्कार, लक्ष्मीबाई टिळक पारितोषिक, गिरीजा किर कथा पुरस्कार, खान्देशकन्या स्मिता पाटील साहित्य पुरस्कारासह विविध पुरस्कारांना गौरविण्यात आले होते. तब्बल चार दशकांहून अधिक काळ त्यांनी विनोदी लेखनात ठेवलेले सातत्य आणि लेखनातील प्रयोगशीलता ही वैशिष्ट्ये होती. त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना, मुलगी, नातवंडे असा परिवार आहे.

टॅग्स :Nashikनाशिकliteratureसाहित्य