शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

दिवाळीत शहरामध्ये अत्यंत कमी वायू प्रदूषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2019 00:54 IST

केंद्र शासनाने प्रदूषणाचा धोका असलेल्या शहरांमध्ये नाशिकचा समावेश केल्यानंतर शहराची हवा शुद्ध करण्यासाठी अभियान राबविण्याची तयारी सुरू असतानाच दिवाळीत मात्र फटक्यांचा जोर यंदा कमी असल्याने वायुप्रदूषणात घट झाली आहे. त्यामुळे नाशिककरांना मोठा दिलासा मिळाला आहे.

ठळक मुद्देप्रदूषण मंडळाची माहिती : फटक्यांच्या कडकडाटात घट

नाशिक : केंद्र शासनाने प्रदूषणाचा धोका असलेल्या शहरांमध्ये नाशिकचा समावेश केल्यानंतर शहराची हवा शुद्ध करण्यासाठी अभियान राबविण्याची तयारी सुरू असतानाच दिवाळीत मात्र फटक्यांचा जोर यंदा कमी असल्याने वायुप्रदूषणात घट झाली आहे. त्यामुळे नाशिककरांना मोठा दिलासा मिळाला आहे.दरवर्षी दिवाळीदरम्यान राज्यातील हवेच्या गुणवत्तेची राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळामार्फत तपासणी केली जाते. त्यानुसार यंदाही करण्यात आली. त्याचप्रमाणे केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वतीनेदेखील तपासणी करण्यात आली. या हवा गुणवत्तेची आकडेवारी नुकतीच जाहीर करण्यात आली. त्यानुसार या वर्षाच्या दिवाळीत राज्यातील सर्वात वाईट हवेची गुणवत्ता उत्सवाच्या दुसऱ्या दिवशी कल्याणमध्ये नोंदवली गेली. मात्र, या आकडेवारीनुसार राज्याच्या बहुतांश भागात मागील वर्षाच्या तुलनेत वायुप्रदूषण कमी असल्याचे नोंदवण्यात आले.औरंगाबाद, चंद्रपूर, कल्याण, मुंबई, नाशिक, नवी मुंबई, पुणे, सोलापूर, ठाणे आणि नागपूर या सर्व दहा शहरांचे वायू गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) सणाच्या काळात चांगले, समाधानकारक आणि मध्यम पातळीवर मोजले गेले.त्यातही नाशिकचे प्रदूषण दिवाळीच्या काळात अत्यंत कमी होते. ५ नोव्हेंबर रोजी तर नाशिक शहराचे वातावरण देशभरात उत्कृष्ट म्हणून नोंदवले गेले आहे.एक्यूआय हे वातावरणातील प्रदूषकांच्या केंद्रीकरणाचे मोजमाप करणारे एकक आहे. वातावरणाच्या गुणवत्तेवर फटाके फोडण्यामुळे होणाºया परिणामाचे परीक्षण करण्यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे दिवाळीदरम्यान तीन दिवस वायुप्रदूषणाची पातळी मोजली गेली. एक्यूआय ३३ आणि ३१ हे दोन्हीही आकडे उत्तम एक्यूआय म्हणून ग्राह्य धरले जातात. 

टॅग्स :Nashikनाशिकpollutionप्रदूषणDiwaliदिवाळी