डी.एड.साठी पहिल्याच दिवशी १९० प्रवेश निश्चित

By Admin | Updated: July 7, 2014 00:51 IST2014-07-07T00:48:03+5:302014-07-07T00:51:48+5:30

डी.एड.साठी पहिल्याच दिवशी १९० प्रवेश निश्चित

On the very first day for admission in admission in 1990, | डी.एड.साठी पहिल्याच दिवशी १९० प्रवेश निश्चित

डी.एड.साठी पहिल्याच दिवशी १९० प्रवेश निश्चित

 

नाशिक : महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांच्या वतीने डी.एड. प्रवेशप्रक्रियेस प्रारंभ झाला. जिल्ह्यातील ४२ महाविद्यालयांसाठी राबविण्यात येणाऱ्या प्रवेशप्रक्रियेत पहिल्याच दिवशी १९० विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित करण्यात आले. येत्या १२ तारखेपर्यंत सदर प्रवेशप्रक्रिया राबविली जाणार आहे.
डी.एड. प्रवेशासाठी प्रथमवर्ष प्रवेशफेरीकरिता विभागस्तरावरील ७० टक्के जागांकरिता प्रवेशाची पहिली फेरी बी.डी. भालेकर हायस्कूल येथे सुरू झाली. प्रवेश फेरीच्या पहिल्या दिवशी विज्ञान शाखेच्या खुल्या व मागाससंवर्गातील विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी आमंत्रित करण्यात आले होते.
सुमारे ४०० विद्यार्थ्यांची पहिल्या फेरीसाठी निवड करण्यात आली होती. त्यातील १९० विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित करण्यात आले. ज्यांना १२ वी मध्ये २९७ ते ६०० असे गुण आहेत त्यांना पाचारण करण्यात आले होते. उद्या विज्ञान शाखेच्या २६७ ते २९६, तर वाणिज्य शाखेच्या २६७ ते ६०० या दरम्यान गुण असलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी पाचारण करण्यात आले आहे.
येत्या १२ तारखेपर्यंत चालणाऱ्या या प्रवेशप्रक्रियेत ७० टक्के जागा भरल्या जाणार आहेत. १२ तारखेला इंग्रजी माध्यमाच्या व उर्दू माध्यमाच्या सर्व जागांसाठी प्रवेशप्रक्रिया राबविली जाणार आहे. (प्रतिनिधी)

Web Title: On the very first day for admission in admission in 1990,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.