शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या अपंगत्व प्रमाणपत्रांची होणार पडताळणी, कर्मचाऱ्यांमध्ये धाकधूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2017 16:03 IST

शिक्षकांवर निलंबनाची कारवाई झाल्यानंतर आता जिल्हा परिषदेतील अपंग कर्मचाऱ्यांच्या प्रमाणपत्रंचीही बदल्यांपूर्वी तपासणी करण्यात येणार आहे.

ठळक मुद्देअपंग कर्मचाऱ्यांच्या प्रमाणपत्रंचीही बदल्यांपूर्वी तपासणी सवलतींचा फायदा लाटणाऱ्या कर्मचारी वर्गात धाकधुकीचे वातावरणकारवाई निश्चित असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी केले स्पष्ट

नाशिक : बनावट प्रमाणपत्रांच्या आधारे बदलीसाठी अर्ज करणाऱ्या शिक्षकांवर निलंबनाची कारवाई झाल्यानंतर आता जिल्हा परिषदेतील अपंग कर्मचाऱ्यांच्या प्रमाणपत्रंचीही बदल्यांपूर्वी तपासणी करण्यात येणार असल्याने बनावट प्रमाणपत्र सादर करून सवलतींचा फायदा लाटणाऱ्या कर्मचारी वर्गात धाकधुकीचे  वातावरण निर्माण झाले आहे.शिक्षक सर्वसाधारण बदल्या सन 2017 साठी प्रवर्ग 1 मधून फॉर्म भरताना मुदत संपलेल्या अपंग प्रमाणपत्रंचा तसेच बनावट प्रमाणपत्रंचा वापर करून फायदा लाटण्याचा प्रयत्न करणाऱ्या शिक्षकांविरोधात प्राप्त तक्रारीनुसार पाच शिक्षकांना निलंबित करण्यात आले असून, कळवणच्या चार व त्र्यंबकेश्वरच्या एका शिक्षकावर फौजदारी तथा प्रशासकीय कार्यवाही करण्यात आली आहे. त्यामुळे बनावट अपंगत्व प्रमाणपत्रच्या आधारे विविध सवलतींचा लाभ घेणाऱ्या जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांवरही अशी कारवाई होणार का? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. त्यावर अपंगत्वाचा बनावट दाखला सादर करून सवलतींचा फायदा घेणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई निश्चित असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मीणा यांनी स्पष्ट केले आहे. जिल्हा परिषदेत कर्मचारी बदलीची प्रक्रिया सुरू झाली की, अनेक कर्मचारी प्रकृती अस्वास्थ्याचे दाखले देऊन तर काही चक्क अपंगत्वाचे बनावट दाखले सादर करून सोयीची जागा मिळविण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे खऱ्या अर्थाने बदलीप्राप्त कर्मचाऱ्यांवर आतार्पयत अन्याय होत आल्याची उदाहरणो शासकीय कार्यालयांमध्ये दिसून येतात. परंतु, आमदार बच्चू कडू यांनी अपंगांच्या मुद्दय़ावर नाशिकमध्ये आंदोलन केल्यानंतर जिल्हा परिषदेलाही भेट देऊन अपंगत्वाच्या बनावट प्रमाणपत्रंचा मुद्दा उपस्थित केला होता. तसेच बनावट प्रमाणपत्र सादर करणाऱ्यांवर कारवाईची मागणीही केली होती. त्यानंतर प्रशासनाने धसका घेऊन बनावट प्रमाणपत्र सादर करणाऱ्या शिक्षकांवर निलंबनाची कारवाई केली असून, आता जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या बदली प्रक्रियेतही प्रमाणपत्रंची पडताळणी होणार असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे बनावट प्रमाणपत्रांच्या साह्याने सवलतींचा लाभ घेणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये धाकधूक निर्माण झाली आहे.

टॅग्स :nashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषदEmployeeकर्मचारीTeacherशिक्षक