शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

व्हेंटिलेटरअभावी थांबला अर्भकाचा श्वास!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2017 00:53 IST

नाशिक : आॅगस्ट महिन्यात ५५ अर्भके दगावल्याने चर्चेत असलेल्या नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात आणखी एक अर्भक दगावले. हरसूलच्या ग्रामीण रुग्णालयात मध्यरात्री जन्मलेल्या बाळाची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे त्याला तत्काळ जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले; मात्र रुग्णालयाच्या शिशू दक्षता विभागात बाळांसाठी लागणाºया विशेष व्हेंटिलेटरची सुविधा नसल्यामुळे अर्भकाचा श्वास थांबल्याची घटना मंगळवारी (दि.२६) उघडकीस आली.पेठ ...

नाशिक : आॅगस्ट महिन्यात ५५ अर्भके दगावल्याने चर्चेत असलेल्या नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात आणखी एक अर्भक दगावले. हरसूलच्या ग्रामीण रुग्णालयात मध्यरात्री जन्मलेल्या बाळाची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे त्याला तत्काळ जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले; मात्र रुग्णालयाच्या शिशू दक्षता विभागात बाळांसाठी लागणाºया विशेष व्हेंटिलेटरची सुविधा नसल्यामुळे अर्भकाचा श्वास थांबल्याची घटना मंगळवारी (दि.२६) उघडकीस आली.पेठ तालुक्यातील एका  आदिवासी पाड्यावरील हेमलता  जगदीश कहांडोळे या महिलेला प्रसूतीवेदना होऊ लागल्याने कुटुंबीयांनी हरसूलच्या ग्रामीण रुग्णालयात सोमवारी रात्री दीड वाजता दाखल केले. रुग्णालयात प्रसूती झाल्यानंतर बाळाची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी जिल्हा रुग्णालयात बाळ-मातेला हलविण्याचा सल्ला दिला. मध्यरात्री नवजात शिशुला जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. येथील नवजात शिशु दक्षता विभागात बाळाला उपचारार्थ दाखल करून घेण्यात आले; मात्र बाळाची अपुरी वाढ होऊन ३२ आठवड्यांतच प्रसूती झाल्याने प्रकृती गंभीर होती, असे येथील डॉक्टरांनी सांगितले. रक्तस्त्राव बंद करण्याचा प्रयत्न केला; मात्र व्हेंटिलेटरशिवाय बाळाला वाचविणे शक्य नसल्याने कुटुंबीयांना आडगावच्या पवार वैद्यकीय महाविद्यालयात हलविण्याचा सल्ला येथील डॉक्टरांनी दिला. मात्र पवार वैद्यकीय महाविद्यालयातही व्हेंटिलेटर रिकामे नसल्याने त्यांनी पुन्हा बाळाला जिल्हा रुग्णालयात आणले. डॉक्टरांनी पुन्हा तपासून एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यास सांगितले. दरम्यान, तेथे जाताना रस्त्यातच या बालकाचा मृत्यू झाला.३२ आठवड्यांचे बाळ जन्माला आले. फुफ्फुसामध्येही रक्तस्त्राव होत होता. बाळावर शक्य तेवढे उपचार करून रक्तस्त्राव थांबविला. आॅक्सिजन देण्याचा प्रयत्न केला; मात्र व्हेंटिलेटरशिवाय बाळाला वाचविणे शक्य नव्हते आणि विभागात व्हेंटिलेटर उपलब्ध नसल्यामुळे पवार रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला; मात्र काही वेळेतच क हांडोळे कुटुंबीय बाळाला घेऊन पुन्हा परतले.  - डॉ. दिनेश ठाकूर, नवजात शिशू अतिदक्षता विभागदौरे झाले, पण फलित काय?५५ अर्भकांचा मृत्यू झाल्याची घटना राज्यभर गाजल्यानंतर नगरसेवकांपासून ते राज्याच्या आरोग्यमंत्र्यांपर्यंत सर्वांनी नाशिकच्या जिल्हा रुग्णालयाची वारी केली. पाहणी केली, आश्वासनांची खैरात केली; मात्र फलित काय? असाच प्रश्न या घटनेमुळे पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. जिल्हा रुग्णालयाचा नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्याप ‘व्हेंटिलेटर’वर असल्याने बालके दगावत आहेत. येथील रुग्णालयात पुरेशा संख्येने वॉर्मरही नाही आणि मनुष्यबळही नसल्याने चिंता व्यक्त होत आहे.४२ शिशू उपचारार्थ दाखलनाशिकच्या जिल्हा रुग्णालयात ‘वॉर्मर’ची संख्या तोकडी असून, अत्यवस्थ अवस्थेत दाखल होणाºया अर्भकांचे प्रमाण अधिक आहे. १८ वॉर्मर असलेल्या शिशू अतिदक्षता विभागात सध्या ४२ बालके उपचारार्थ दाखल आहेत. वॉर्मरची संख्या कमी आणि बालके दगावण्याचा धोका अधिक असल्यामुळे एका वॉर्मरवर तीन ते चार शिशूंना ठेवून प्रशासनाला उपचार करावे लागत आहे.‘टर्शरी केअर सेंटर’ला  मान्यता कधी ?नाशिकचे जिल्हा शासकीय रुग्णालय श्रेणी दोनमध्ये समाविष्ट असल्यामुळे अडचण निर्माण होऊन शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार या रुग्णालयाला ‘टर्शरी केअर सेंटर’ अद्याप उपलब्ध होऊ शकलेले नाही, परिणामी आॅक्सिजनची गरज भासणाºया नवजात शिशूंवर उपचारासाठी व्हेंटिलेटरसह ते हाताळणारे तज्ज्ञ डॉक्टरदेखील पुरविले गेलेले नाहीत. यामुळे अखेरच्या टप्प्यात धोक्याची पातळी ओलांडलेल्या गंभीर शिशूंचा आॅक्सिजनअभावी मृत्यू होत आहे. ही सरकारी त्रुटी कशी दूर होईल, असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित  केला आहे.