वैनतेयच्या विद्यार्थ्यांना मिळाले तणावमुक्त अभ्यासाचे धडे

By Admin | Updated: August 13, 2014 00:45 IST2014-08-11T21:06:54+5:302014-08-13T00:45:50+5:30

वैनतेयच्या विद्यार्थ्यांना मिळाले तणावमुक्त अभ्यासाचे धडे

Ventee's students get stress-free study lessons | वैनतेयच्या विद्यार्थ्यांना मिळाले तणावमुक्त अभ्यासाचे धडे

वैनतेयच्या विद्यार्थ्यांना मिळाले तणावमुक्त अभ्यासाचे धडे

 

निफाड : येथील वैनतेय विद्यालयाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त वैनतेय विद्यालय व ज्यु. कॉलेजमध्ये समुपदेशन विभागाच्या वतीने बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘तणावमुक्त अभ्यासाचे नियोजन’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. नाशिक येथील क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट आदिती जोशी यांनी विद्यार्थी व पालक यांनी घ्यावयाची काळजी या विषयी सविस्तर मार्गदर्शन केले. न्या. रानडे विद्या प्रसारक मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष प्रल्हाद पाटील-कराड अध्यक्षस्थानी होते. प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे विश्वस्त वि. दा. व्यवहारे, रतन पाटील वडघुले, अ‍ॅड. दिलीप वाद्यावकन, किरण कापसे, भालचंद्र मोगल, प्राचार्य के. के. निकम
आदि मान्यवर उपस्थित होते. मार्गदर्शन करताना जोशी यांनी सांगितले की, दहावी, बारावीचे वर्ष महत्त्वाचे आहे. हे विद्यार्थीदशेतच मुलांच्या
मनावर पालक आणि शिक्षक बिंबवत असतात. त्यामुळे मुले या वर्षांमध्ये एका वेगळ्या चिंतेत वावरू लागतात. वास्तविक सर्वच इयत्ता महत्त्वाच्या असतात. त्यामुळे टेंशन न घेता अभ्यास करा, यश तुमचेच असेल, असेही जोशी यांनी सांगितले. मान्यवर पाहुण्यांनीही यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. (वार्ताहर)

Web Title: Ventee's students get stress-free study lessons