नो पार्किंगमधील वाहनांवर होणार पुन्हा कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:13 IST2021-05-23T04:13:01+5:302021-05-23T04:13:01+5:30
नाशिक : नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाच्या वाहतूक शाखेच्या माध्यमतातून नो- पार्किंग झोनमधील वाहनांवर कारवाई करण्यासाठी तसेच ही वाहने टोईंग ...

नो पार्किंगमधील वाहनांवर होणार पुन्हा कारवाई
नाशिक : नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाच्या वाहतूक शाखेच्या माध्यमतातून नो- पार्किंग झोनमधील वाहनांवर कारवाई करण्यासाठी तसेच ही वाहने टोईंग करण्यासाठी ई टेंडर प्रक्रिया राबवून हे टेंडर एका संस्थेला देण्यात आले आहे. शहरातील वाहतूक सुरळीत, सुव्यवस्थित व्हावी तसेच वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी ही टेंडर प्रक्रिया राबविली जात असल्याचे पोलीस आयुक्तालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. या टेंडर प्रक्रियेतून जूने नाशिकमधील श्रमसाफल्य सर्विसेसच्या माध्यमातून शशि हिरवे यांना वाहन टोईंगचे काम देण्यात आले असून त्यांच्या सोबत तीन महिन्यांचा करारनामा करण्यात येणार आहे. या करारनाम्याबाबत नागरिकांच्या काही तक्रारी व मार्गदर्शनपर सुचना असल्यास तसे लेखी स्वरुपात सहायक पोलीस आयुक्त शहर वाहतूक विभाग यांना १५ दिवसांच्या आत कळविण्याचे आवाहन पोलीस आयुक्त कार्यालयार्फे करण्यात आले आहे.