एमजीरोडवर वाहने घसरली : आॅइल पडल्याने रस्ता निसरडा
By Admin | Updated: April 10, 2017 17:07 IST2017-04-10T17:07:41+5:302017-04-10T17:07:41+5:30
आॅइल सांडल्याने रस्ता निसरडा होऊन पाच ते सहा दुचाकी वाहने घसरल्याची घटना घडली.

एमजीरोडवर वाहने घसरली : आॅइल पडल्याने रस्ता निसरडा
नाशिक : एमजीरोडवर अचानकपणे एका वाहनातून आॅइल सांडल्याने रस्ता निसरडा होऊन पाच ते सहा दुचाकी वाहने घसरल्याची घटना घडली. वाहने घसरू लागल्याने ज्या ठिकाणी आॅइल सांडलेले होते. त्याभोवती बॅरिकेड लावण्यात आले. एमजीरोड अरूंद व वर्दळीचा असल्यामुळे वाहतूक ठप्प झाली होती. याबाबत वाहतूक पोलिसांना तातडीने परिसरातील नागरिकांनी माहिती दिली. यानंतर पोलिसांनी अग्निशामक दलाला कळवून रस्त्यावर माती टाकण्याच्या सुचना केली.