शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: आता दुचाकीसाठी १००, तर चारचाकीसाठी १००० रुपयांचंच इंधन मिळणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2020 15:38 IST

coronavirus अनेक जण वाहनं घेऊन रस्त्यावर येत असल्यानं जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय

नाशिक: कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जनता कर्फ्यू पाळण्याचं आवाहन केलं होतं. पंतप्रधानांच्या आवाहनाला देशभरातील जनतेनं उत्स्फूर्त प्रतिसादही दिला. मात्र काल जनता कर्फ्यू पाळल्यानंतर आज देशभरातल्या रस्त्यांवर पुन्हा वर्दळ दिसू लागली. रस्ते, बसेस बंद करण्यात आल्यानं अनेकजण खासगी वाहनं घेऊन रस्त्यावर आले. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग होण्याची भीती वाढू लागलीय. या पार्श्वभूमीवर नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांनी महत्त्वाचा निर्णय घेतलाय.नागरिकांनी घराबाहेर पडणं टाळावं, असं आवाहन वारंवार सरकार आणि प्रशासनाकडून केलं जातंय. मात्र तरीही अनेक जण घराबाहेर पडत आहेत. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बंद असल्यानं खासगी वाहनं घेऊन रस्त्यावर उतरणाऱ्यांची संख्या अतिशय मोठी आहे. त्यामुळे आता दुचाकी आणि चारचाकी वाहनांना मर्यादित इंधन देण्याचा निर्णय नाशिकचे जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी घेतला. त्यामुळे आता दुचाकीस्वारांना १०० रुपयांचं पेट्रोल मिळेल. तर चारचाकी वाहनांना जास्तीत जास्त एक हजार रुपयांचं इंधन देण्यात येईल. नागरिकांनी घराबाहेर पडू नये आणि कोरोनाचा संसर्ग वाढू नये या हेतूनं नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांनी इंधन पुरवठ्यावर निर्बंध आणले आहेत. आज सकाळपासून रस्त्यावरील वाहतूक वाढल्यानं जिल्हाधिकारी मांढरे यांनी महत्त्वाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यात हा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे आता वाहन चालकांना मर्यादित इंधन मिळेल. काही जण वेगवेगळ्या पेट्रोल, डिझेल पंपांवर जाऊन निर्णयाचं उल्लंघन करू शकतात. अशा व्यक्तींवर नजर ठेवण्यासाठी डिजिटल यंत्रणा कार्यान्वित केली जाणार आहे. या यंत्रणेच्या माध्यमातून नियम मोडण्याचा प्रयत्न करणाऱ्यांविरोधात कलम १८८ आणि १४४ अंतर्गत कारवाई करण्यात येईल. अशा व्यक्तींना सहा महिन्यांचा तुरुंगवास होऊ शकतो. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसPetrol Pumpपेट्रोल पंप