वर्गणीच्या कारणावरून वाहनाचे नुकसान

By Admin | Updated: March 19, 2017 00:51 IST2017-03-19T00:50:47+5:302017-03-19T00:51:02+5:30

नाशिक : नवरात्र उत्सवातील वर्गणीच्या कारणावरून तिघा संशयितांनी एका घरावर तसेच गाडीवर दगडफेक केल्याची घटना शुक्रवारी सावरकरनगरमध्ये घडली़

Vehicle damage due to the sale | वर्गणीच्या कारणावरून वाहनाचे नुकसान

वर्गणीच्या कारणावरून वाहनाचे नुकसान

 नाशिक : गतवर्षीच्या नवरात्र उत्सवातील वर्गणीच्या कारणावरून तिघा संशयितांनी एका दाम्पत्यास शिवीगाळ करून घरावर तसेच गाडीवर दगडफेक केल्याची घटना शुक्रवारी (दि़ १७) रात्रीच्या सुमारास सावरकरनगरमध्ये घडली़ या प्रकरणी संशयित स्वप्निल शांताराम आव्हाड (रा़ राजश्री पार्क, सावरकरनगर, नाशिक) यास अटक करण्यात आली असून, त्याचे दोन साथीदार मात्र फरार झाले आहेत़
रवींद्र भास्कर धुमाळ (रा. सावरकरनगर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार शुक्रवारी रात्री साडेबारा ते पाऊण वाजेच्या सुमारास ते आपल्या घरासमोर उभे होते़ त्यावेळी संशयित स्वप्निल आव्हाड हा आपल्या दोघा साथीदारांसमवेत तिथे आला़ त्यांनी गतवर्षीच्या नवरात्रोत्सवातील वर्गणीच्या कारणातून वाद घालून धुमाळ यांना धक्काबुक्की व शिवीगाळ केली, तर त्यांच्या पत्नीस घरात ढकलून दिले़ यानंतर या तिघांनी धुमाळ यांच्या घराच्या खिडकीवर तसेच वाहनावर दगडफेक केली़ यामध्ये कारचे (एमएच १५, डीसी ३०४४) मोठे नुकसान झाले़

Web Title: Vehicle damage due to the sale

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.