वर्गणीच्या कारणावरून वाहनाचे नुकसान
By Admin | Updated: March 18, 2017 21:23 IST2017-03-18T21:23:13+5:302017-03-18T21:23:13+5:30
गतवर्षीच्या नवरात्र उत्सवातील वर्गणीच्या कारणावरून तिघा संशयितांनी एका दाम्पत्यास शिवीगाळ करून घरावर तसेच गाडीवर दगडफेक केल्याची घटना

वर्गणीच्या कारणावरून वाहनाचे नुकसान
नाशिक : गतवर्षीच्या नवरात्र उत्सवातील वर्गणीच्या कारणावरून तिघा संशयितांनी एका दाम्पत्यास शिवीगाळ करून घरावर तसेच गाडीवर दगडफेक केल्याची घटना शुक्रवारी (दि़ १७) रात्रीच्या सुमारास सावरकरनगरमध्ये घडली़ या प्रकरणी संशयित स्वप्निल शांताराम आव्हाड (रा़ राजश्री पार्क, सावरकरनगर, नाशिक) यास अटक करण्यात आली असून, त्याचे दोन साथीदार मात्र फरार झाले आहेत़
रवींद्र भास्कर धुमाळ (रा. मृत्युंजय अपा., सावरकरनगर) यांनी सातपूर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार शुक्रवारी रात्री साडेबारा ते पाऊण वाजेच्या सुमारास ते आपल्या घरासमोर उभे होते़ त्यावेळी संशयित स्वप्निल आव्हाड हा आपल्या दोघा साथिदारांसमवेत तिथे आला़ त्यांनी गतवर्षीच्या नवरात्रोत्सवातील वर्गणीच्या कारणातून वाद घालून धुमाळ यांना धक्काबुक्की व शिवीगाळ केली, तर त्यांच्या पत्नीस घरात ढकलून दिले़ यानंतर या तिघांनी धुमाळ यांच्या घराच्या खिडकीवर तसेच वाहनावर दगडफेक केली़ यामध्ये कारचे (एमएच १५, डीसी ३०४४) मोठे नुकसान झाले़
याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात तिघा संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे़