सातपूरला वाहनांची तोडफोडां
By Admin | Updated: August 18, 2016 00:28 IST2016-08-18T00:25:30+5:302016-08-18T00:28:12+5:30
प् धरा गाड्यांचे नुकसान : समाजकंटकांचे कृत्य; दहशत माजविण्याचा प्रकार; गुन्हा दाखल

सातपूरला वाहनांची तोडफोडां
सातपूर : सातपूर कॉलनी परिसरातील १० ते १५ चारचाकी वाहनांच्या काचा फोडून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न अज्ञात समाजकंटकांनी मंगळवारी (दि़ १६) मध्यरात्रीच्या सुमारास केला़ या घटनेमुळे परिसरात दहशत आणि घबराटीचे वातावरण निर्माण झाले असून या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
सातपूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवारी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास पेट्रोलिंग करीत असताना पोलिसांना सातपूर कॉलनीत सुयोग हॉस्पिटल ते मनाज वाईन ते उद्योग भवन, शिवनेरी उद्यान, साईबाबा मंदिर आदि परिसरातील रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ११ चारचाकी वाहनांच्या काचा अज्ञात समाजकंटकांनी फोडून वाहनांचे नुकसान केले. अजूनही काही वाहनांचे नुकसान झाल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. यातील एका वाहनात चालक झोपलेला होता. या प्रकरणी पोलीस हवालदार राजेंद्र घुमरे यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
सातपूर कॉलनी परिसरात एकाच वेळी अनेक वाहनांचे समाजकंटकांकडून नुकसान होण्याची ही पहिलीच घटना आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये दहशत आणि घबराटीचे वातावरण पसरले आहे.
या समाजकंटकांच्या कृत्याविषयी दिवसभर अनेक चर्चा आणि अफवा सुरू होत्या. परंतु कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याची काळजी घेण्यात आली.
नागरिकांनी संयम दाखवित पोलिसांना सहकार्य केले या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त श्रीकांत धिवरे, सहायक पोलीस आयुक्त ठाकूर, पोलीस निरीक्षक मनोज करंजे यांनी भेट देऊन माहिती घेतली, तर पोलिसांनी सर्व वाहनांचे रीतसर पंचनामे केले आहेत. तसेच आमदार सीमा हिरे, स्थायी सभापती सलीम शेख, नगरसेवक उषा शेळके यांनीही भेट दिली. (वार्ताहर)