भाजीपाला, डाळींमुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री ; हरभरा डाळीने भागविली भूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:11 IST2021-07-24T04:11:07+5:302021-07-24T04:11:07+5:30
चौकट- डाळींचे दर (प्रतिकिलो) हरभरा - ८० तूर - ११० मूग - १०० उडीद - ११० मसूर - ९५ ...

भाजीपाला, डाळींमुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री ; हरभरा डाळीने भागविली भूक
चौकट-
डाळींचे दर (प्रतिकिलो)
हरभरा - ८०
तूर - ११०
मूग - १००
उडीद - ११०
मसूर - ९५
मठडाळ- १२०
चौकट-
भाजीपाल्याचे भाव (प्रतिकिलो)
बटाटा - २०
कांदा - २५
टोमॅटो - २५
काकडी - १५
कोथिंबीर - ४० (जुडी)
पालक - १०
मेथी - २५
कांदापात - २५
शेपू- १५
दोडके - ६०
लिंबू - २ (नग)
गवार - ६०
वांगी - ४०
गिलके - ६०
हि.मिरची- ६०
शेवगा - ८०
कारले- ४०
वाल- ६०
चवळी - ४०
भेंडी - ३०
लसुन - १२०
चौकट-
म्हणून डाळ महागली
कच्च्या मालाचे दर वाढले की संबंधित वस्तूंची दरवाढ होणे अपरिहार्य आहे. शेतीत मजुरीचे दर वाढले, खते,बियाणे महागले त्यामुळे उत्पादन खर्च वाढला. याशिवाय पेट्रोल, डिझेलचे दर वाढल्याने वाहतुकीचे दर वाढले आहेत. याशिवाय डाळमिल चालकांनीही दरवाढ केली असल्याने डाळींच्या दरांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली असल्याचे दिसून येत आहे.
चौकट-
म्हणून भाजीपाला कडाडला
पावसामुळे शेतातून भाजीपाला काढणे कठीण होते. यामुळे आवक कमी होत आहे. त्या तुलनेत मागणी वाढलेली असल्यामुळे भाजीपाल्याचे दर वाढले आहेत. याशिवाय भाजीपाला वाहतुकीचा खर्च अधिक होऊ लागला आहे. शेतकऱ्यांनाही चांगल्या दराची अपेक्षा आहे. या सर्व बाबींचा परिणाम भाजीपाल्याचे दरांवर होत आहे.
चौकट-
सर्वसामान्यांचे हाल
कोट-
डाळी, भाजीपाला महागल्याने स्वयंपाक घरातील खर्चात मोठी वाढ झाली आहे. कोरोनामुळे पगारात झालेली कपात अद्याप पूर्ववत झालेली नाही. दवाखाना आणि इतर गोष्टींचा खर्च वाढल्याने आहे त्या पगारात सर्व गरजा भागविणे कठीण बनले आहे. - मनीषा वाघ, गृहिणी
कोट-
घराच्या कर्जाचे हप्ते, रोजच्या रोज वाढणारे पेट्रोलचे दर यामुळे सर्वसामान्यांना जगणे कठीण झाले आहे. भाजीपाल्याबरोबरच डाळींही वाढल्याने आहे त्या पगारात भागविणे कठीण झाले आहे. नेमके काय करावे हे समजत नाही. - अर्चना देवरे, गृहिणी