भाज्या झाल्या स्वस्त मात्र तेल पुन्हा महागले; सफरचंद २४० रुपये किलो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:14 IST2021-05-10T04:14:31+5:302021-05-10T04:14:31+5:30
चौकट - शेपू ३० रुपये जुडी घाऊक बाजारात भाज्यांचे दर कोसळले आहेत. गावठी कोथिंबीर २५ ते ५० रुपयांपर्यंत, तर ...

भाज्या झाल्या स्वस्त मात्र तेल पुन्हा महागले; सफरचंद २४० रुपये किलो
चौकट -
शेपू ३० रुपये जुडी
घाऊक बाजारात भाज्यांचे दर कोसळले आहेत. गावठी कोथिंबीर २५ ते ५० रुपयांपर्यंत, तर शेपूची भाजी १० ते ३० रुपये जुडीपर्यंत विकली जात आहे. वांगी, फ्लॉवर, कोबी, सिमला मिरची या फळभाज्यांचे दरही उतरले आहेत.
चाैकट -
शेंगदाणा तेल १९० रु. लिटर
किराणा बाजारात खाद्यतेलाचे दर पुन्हा तेजीकडे झुकले आहेत. सोयाबीन तेल लिटरमागे पाच रुपयांनी वाढले आहे, तर शेंगदाणा तेल तब्बल १८० ते १९० रुपये लिटरपर्यंत पोहोचले आहे. डाळी, तांदूळ, गहू यांचे दर स्थिर आहेत.
चौकट -
किवी १५० रुपयांना तीन नग
कोरोनामुळे सर्वच फळांची मागणी वाढली असून, फळांचे दर वाढले आहेत. किवी आणि ड्रॅगन फ्रुट यांना विशेष मागणी असून, किवी १५० रुपयांना तीन नग तर ड्रॅगन फ्रुट १०० ते १२० रुपयांना एक नग याप्रमाणे या फळांची विक्री होत आहे.
कोट -
किराणा बाजारात वेळेच्या बंधनामुळे ग्राहकीवर मोठा परिणाम झाला आहे. १० वाजेपर्यंत ग्राहक येत नाहीत त्यानंतर सुरुवात झाली तर लगेच बंद करण्याची वेळ होते. अधिक वेळ दुकान चालविले तर दंड होतो. तेलवगळता सर्व वस्तूंचे भाव स्थिर आहेत. - शेखर दशपुते, किराणा व्यापारी
कोट -
शेतकऱ्यांवर मागील वर्षीप्रमाणेच वेळ येऊ पहात आहे. भाव कमी झाल्याने पालेभाज्या पिकविण्याचा खर्चही निघणे मुश्कील झाले आहे. मागील वर्षी भाजीपाला फेकून द्यावा लागला होता. आताही दर कमी होऊ लागले आहेत. - गणेश दौंडे, शेतकरी
कोट -
सर्वसामान्य नागरिकांना सर्व आर्थिक खर्च भागविताना तारेवरची कसरत करावी लागते. तेल वाढत असतानाच त्यात आता पेट्रोलच्या दराचीही भर पडली आहे. कोरोनामुळे पगार कमी झालेले असतानाच महागाई मात्र वाढतच आहे. - मनीषा वाघ, गृहिणी