भाजीपाला विक्रेत्यांचे आंदोलन
By Admin | Updated: September 22, 2015 00:01 IST2015-09-21T23:59:52+5:302015-09-22T00:01:28+5:30
बेमुदत उपोषणाचा इशारा : सेलहॉल प्रकरण

भाजीपाला विक्रेत्यांचे आंदोलन
पंचवटी : सायंकाळच्या सुमाराला शेतमाल खरेदी करून तोच शेतमाल पहाटेच्या वेळी बाजार समितीच्या सेलहॉलमध्ये बसून विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांवर बाजार समितीने निर्बंध घातल्याने सोमवारी व्यापाऱ्यांनी बाजार समितीच्या मुख्य कार्यालयासमोर बैठे आंदोलन केले.
गेल्या तीन आठवड्यांपासून बाजार समितीचे सभापती देवीदास पिंगळे यांनी किरकोळ व्यापाऱ्यांना बाजार समितीच्या सेलहॉलमध्ये बसून व्यवहार करण्यास मनाई केल्याने व्यापारी संतप्त झाले आहेत. व्यापाऱ्यांना सेलहॉलमध्ये बसू दिले जात नसल्याने सध्या तणावाचे वातावरण पसरले आहे. व्यापाऱ्यांना सेलहॉलमध्ये बसू द्यावे, यासाठी पणनमंत्र्यांनाही निवेदन देण्यात आले आहे. सध्या या व्यापाऱ्यांना सेलहॉलमध्ये बसण्यास मनाई केल्याने व्यापारी संकटात सापडले आहेत. अनेक वर्षांपासून या सेलहॉलमध्ये व्यापारी व्यवसाय करतात, मात्र सभापती पिंगळे हे मनमानी करत असल्याचा आरोप व्यापाऱ्यांनी केला आहे.