भाजीपाला ंिललावास प्रारंभ
By Admin | Updated: July 24, 2016 22:39 IST2016-07-24T22:38:43+5:302016-07-24T22:39:52+5:30
वडनेरभैरव : टमाट्याचे भाव तेजीत

भाजीपाला ंिललावास प्रारंभ
चांदवड : चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वडनेरभैरव येथील उपबाजार आवारात परिसरातील शेतकरी आणि व्यापारी बांधवाच्या मागणीनुसार बाजार समितीचे सभापती डॉ. आत्माराम कुंभार्डे यांच्या हस्ते टमाटा व भाजीपाला लिलावाचा शुभारंभ करण्यात आला. टमाट्याचे भाव तेजीत राहिले.
यावेळी बाजार समितीचे उपसभापती नितीन अहेर, संचालक विलास ढोमसे, विक्रम मार्कंड, पंढरीनाथ खताळ, सुरेश जाधव, प्रभारी सचिव एच. एल. पानसरे यांच्यासह व्यापारी गणेश पाचोरकर, सागर निखाडे, अनिल गुंजाळ, बापू भालेराव, गोरख निकम, केशव जाधव, जितेंद्र जैन, रामनाथ शिंदे, शांताराम ठाकरे, अनिल कोठुळे, सुनील क्षीरसागर, बबनराव पूरकर, योगेश साळुंखे, अनिल पाचोरकर, गणेश पाचोरकर, बाळासाहेब शिंदे, रहेमान पठाण, सोपानराव वक्टे, प्रमोद वक्टे, सुरेश वक्टे, विकास भुजार्ड, अॅड. भवर, म्हसू गागरे उपस्थित होते.
शेतकऱ्यांना विक्री होणाऱ्या मालाचे पैसे रोख दिले जातील, असे सांगण्यात आले. शेतकऱ्यांनी शेतमाल विक्रीस आणावा व इच्छुक व्यापाऱ्यांनी नव्याने अनुज्ञाप्ती घेऊन जावी, असे आवाहन सभापती डॉ. कुंभार्डे व उपसभापती अहेर यांनी केले आहे. (वार्ताहर)
चांदवडला सोमवारी मोफत नेत्रतपासणी शिबिर
चांदवड : येथील जुन्या तहसील कार्यालयासमोर सोमवारी (दि. २५) सकाळी १० ते २ वाजेदरम्यान नेत्रतपासणी शिबिर आयोजित केल्याची माहिती डॉ. भरत कारिया यांनी दिली. यावेळी सुजय नेत्र सेवा रुग्णालयाचे संचालक डॉ. नानासाहेब खरे व डॉ. सुनीता खरे हे रुग्णांची तपासणी करणार आहेत. (वार्ताहर)