भाजीपाला विक्रेत्यांचा स्थलांतरास विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2021 09:00 PM2021-01-21T21:00:01+5:302021-01-22T00:26:11+5:30

मनमाड:- पालिका प्रशासनातर्फे शहरातील भाजी मार्केट गावाबाहेर स्टेडियमवर हलविण्यात आल्याने संतप्त झालेल्या भाजीपाला विक्रेत्यांनी आज पालिकेवर मोर्चा काढून धरणे ...

Vegetable sellers oppose migration | भाजीपाला विक्रेत्यांचा स्थलांतरास विरोध

मनमाड येथे पालिका कार्यालयात गंगाभाऊ त्रिभुवन यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन करताना भाजीपाला विक्रेते.

googlenewsNext
ठळक मुद्देमनमाड पालिकेत धरणे आंदोलन

मनमाड:- पालिका प्रशासनातर्फे शहरातील भाजी मार्केट गावाबाहेर स्टेडियमवर हलविण्यात आल्याने संतप्त झालेल्या भाजीपाला विक्रेत्यांनी आज पालिकेवर मोर्चा काढून धरणे आंदोलन केले .

यावेळी आंदोलकांनी पालिका प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत भाजी मार्केटचे अर्धवट असलेले काम पूर्ण करण्यात यावे व भाजी मार्केट पूर्ववत सुरू करण्याची मागणी केली. शहराचे मध्यवर्ती ठिकाण असलेल्या भगतसिंग मैदानाजवळ जुने भाजी मार्केट तोडून त्या ठिकाणी १९९८ साली नवीन भाजी मार्केटचे काम सुरू करण्यात आले.

मात्र तब्बल २२ वर्षांचा कालावधी उलटल्यानंतर देखील मार्केटचे काम अर्धवट आहे. त्यामुळे भाजीपाला विक्रते मिळेल त्या जागी दुकाने लावून आपला उदरनिर्वाह करतात. मुख्याधिकारी विजय कुमार मुंडे यांच्याकडे वाहतुकीची कोंडी होत असल्याच्या तक्रारी आल्यानंतर, भाजीपाला मार्केट आययूडीपी भागात असलेले महर्षी वाल्मिकी स्टेडियममध्ये हलविण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे भाजी विक्रेत्यांवर अचानक बेरोजगारीचे संकट आल्याने कुटुंबाचे पालनपोषण कसे करावे, असा प्रश्न निर्माण झाला.

अखेर संतप्त झालेल्या भाजी विक्रेत्यांनी नगरसेवक गंगाभाऊ त्रिभुवन यांच्या नेतृत्वाखाली पालिकेवर धडक मोर्चा काढून धरणे आंदोलन केले. आम्हाला व्यवसाय करू द्या नाही तर आत्महत्त्या करण्याची परवानगी द्या, अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. माजी नगराध्यक्ष रहेमान शहा यांनीदेखील भाजी विक्रेत्यांची बाजू मांडली.

प्रशासनातर्फे आश्वासन
मुख्याधिकारी मुंडे यांनी भाजी विक्रेते आणि हातगाडी लावणारे तरुण यांच्या व्यथा जाणून घेतल्या. भाजी मार्केटचे अर्धवट असलेल्या कामाला सुरुवात केली जाईल तोपर्यंत पालिका प्रशासनातर्फे मार्केटच्या आतील साफसफाई करून आणि तेथे सर्व व्यवस्था करून देण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. आंदोलनात मोठ्या संख्येने भाजी विक्रेते सहभागी झाले होते.

Web Title: Vegetable sellers oppose migration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.