पितृपंधरवड्यामुळे भाजीपाल्याचे भाव तेजीत
By Admin | Updated: October 5, 2015 22:38 IST2015-10-05T22:37:58+5:302015-10-05T22:38:26+5:30
पितृपंधरवड्यामुळे भाजीपाल्याचे भाव तेजीत

पितृपंधरवड्यामुळे भाजीपाल्याचे भाव तेजीत
खामखेडा : सध्या पितृपक्ष सुरू असल्याने भाजीपाल्याच्या मागणीत वाढ झाली असून, भावही तेजीत आले आहेत.
पितृपंधरवडा अर्थात पंधरा दिवसांच्या कालावधीत मृत झालेल्या घरातील पूर्वजांचे (आई, वडील, भाऊ, काका, काकू, आजी, आजोबा) श्राद्ध केले जाते आणि या श्राद्धाच्या नैवेद्यासाठी कारले, गिलके, दोडके, गोराणी, चवळी, चक्की, आळूची पानं, डांगर आदिंची भाजी केली जाते. त्याचबरोबर गव्हाची खीर, कढी-भात असे पक्वान्न केले जातात. या जेवणासाठी भाऊबंद, सगे-सोयरे, जवळच्या पाहुण्यांना बोलावले जाते. छतावर नैोद्य ठेवला जातो.
आपल्या पूर्वजांच्या आवडीच्या वस्तू पण ठेवल्या जातात. नैवेद्याला कावळ्याने स्पर्श केला की स्वर्गातील पूर्वजांना जेवण पोहोचले, अशी भावना आजही सर्वत्र आहे. यासाठी लागणाऱ्या विविध प्रकारच्या भाज्यांना सध्या बाजारात मोठी मागणी आहे. प्रत्येकाचे भावही सध्या तेजीत असल्याने सर्वसामान्यांना मात्र महागाईचा फटका सहन करावा लागत आहे. (वार्ताहर)