भाजीबाजाराची दुरवस्था

By Admin | Updated: January 21, 2016 22:46 IST2016-01-21T22:44:21+5:302016-01-21T22:46:11+5:30

साईनाथनगर चौफुली : वाढते अपघात; नागरिक त्रस्त

Vegetable market deterioration | भाजीबाजाराची दुरवस्था

भाजीबाजाराची दुरवस्था

इंदिरानगर : साईनाथनगर चौफुलीलगत लाखो रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या भाजीबाजाराची विक्रेत्यांच्या प्रतीक्षेत दुरवस्था झाली आहे. विक्रेते अद्यापही रस्त्यावरच ठाण मांडून बसत असल्याने वाहतुकीस अडथळा होत असल्याची तक्रार त्रस्त नागरिकांनी केली आहे.
साईनाथनगर, विनयनगर, उद्यान कॉलनी, श्रीजयनगर परिसरात लोकवस्ती झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे नवनवीन समस्या उद्भवत आहेत. रस्त्यावर बसणाऱ्या भाजी विक्रेत्यांमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होऊन किरकोळ अपघातांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे त्रस्त नागरिक आणि भाजी विक्रेत्यांच्या मागणीची दखल घेत १0 वर्षांपूर्वी साईनाथनगर चौफुलीलगत भाजीबाजार तयार करण्यात आला. २५ ते ३0 भाजीविक्रेते बसतील असे सीमेंट काँक्रीटचे ओटे बांधण्यात आले. परंतु येथे बाजारच भरला नसल्याने बाजाराची दयनीय अवस्था झाली आहे.

Web Title: Vegetable market deterioration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.