वीरगाव-ठेंगोडा गटात इच्छुकांची मोर्चेबांधणी

By Admin | Updated: October 17, 2016 23:52 IST2016-10-17T23:18:49+5:302016-10-17T23:52:07+5:30

वीरगाव-ठेंगोडा गटात इच्छुकांची मोर्चेबांधणी

In the Veergaon-Thangoda group, | वीरगाव-ठेंगोडा गटात इच्छुकांची मोर्चेबांधणी

वीरगाव-ठेंगोडा गटात इच्छुकांची मोर्चेबांधणी

 वटार : आगामी काळात होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली असून, इच्छुकांनी जोरदार मोर्चेबांधणी करत आपापले पत्ते उघडण्यास सुरुवात केल्याने ऐन थंडीच्या काळात ग्रामीण भागातील राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे.
मागील आठवड्यात गट व गणाचे आरक्षण पडल्यानंतर राजकीय घडामोडींनी वेग घेतला असून, अनुसूचित जमातीसाठी राखीव झालेल्या वीरगाव गटात जिल्हा परिषदेतील समाज कल्याण विभागाच्या सभापती उषा बच्छाव, तर सर्वसाधारण महिलेसाठी राखीव झालेल्या ठेगोंडा गटातून विद्यमान जि.प. सदस्य शैलेश सूर्यवंशी यांच्या विकासकामाच्या जोरावर पत्नी हेमलता सूर्यवंशी यांच्या उमेदवारीसाठी कार्यकर्त्यांनी गळ घातल्याने निवडणुकीच्या सुरुवातीलाच राजकीय समीकरणांनी वेग घेतल्याने इच्छुक उमेदवारांनी-देखील ‘कानोसा’ घेत आस्ते कदम टाकण्यास सुरुवात केली आहे. ऐन दिवाळीच्या काळात गावपुढाऱ्यांचा भाव वधारणार हे नक्की; परंतु येणारा कालावधी कुणाला लाभदायक ठरतो हे बघण उत्सुकतेचे ठरेल. (वार्ताहर)

Web Title: In the Veergaon-Thangoda group,