वीरगाव : अधिकृत बसथांबा असतानाही वाहकाची मनमानी
By Admin | Updated: February 18, 2015 23:58 IST2015-02-18T23:58:36+5:302015-02-18T23:58:50+5:30
अपंग तरु णाला उतरवले घाटात

वीरगाव : अधिकृत बसथांबा असतानाही वाहकाची मनमानी
वीरगाव : येथील अपंग तरुणाला वाहक व चालकाने दमदाटी व धक्काबुक्की करत थेट वीरगावपासून ५ कि.मी. अंतरावरील ढोलबारे घाटात उतरवून देण्याचा प्रकार घडला. यामुळे प्रवाशांतून संताप व्यक्त करण्यात येत आहे. या अपंग तरुणाला रात्रीच्या सुमारास पायपीट करत घर गाठावे लागल्याने परिवहन महामंडळाचा वीरगाव बसथांबा चर्चेत आला
आहे.
वीरगाव येथे अधिकृत बसथांबा असूनही नंदुरबार, साक्री, नवापूर, सुरत, नाशिक व मालेगाव आगाराचे चालक - वाहक या थांब्याला खो देत असल्यामुळे प्रवाशांची अडवणूक होते. साक्री आगाराच्या चालक व वाहक यांनी वीरगाव येथील अपंग प्रवाशाची अशीच अडवणूक करण्याचा प्रकार मंगळवारी रात्री घडला. काकुळते नामक अपंग तरु ण रात्री ८:३० च्या सुमारास नाशिक-साक्री बसमध्ये देवळा येथून बसला. त्यास वीरगावऐवजी ताहाराबाद येथील तिकीट देण्यात आले. बस वीरगावजवळ आली असता या तरुणाने बस थांबवण्यासाठी विनंती केली. मात्र बस वीरगावला थांबणार नाही तुला ताहाराबादलाच उतरावे लागेल असे सांगत वाहक एम.जी. राऊत यांनी नकार दिला.
बस थांबविण्याची विनंती केल्यानंतर ढोलबारे घाटात निर्जनस्थळी बस थांबवून या तरु णास उतरवून देण्यात आले. या प्रकारानंतर रात्री १०या सुमारास पायपीट करून घर गाठावे लागल्याने महामंडळाच्या कारभाराबाबत प्रवाशीवर्गातून संताप व्यक्त केला जात आहे.