वेधतेय लक्ष...‘नाथझुंड’
By Admin | Updated: September 4, 2015 00:30 IST2015-09-04T00:29:06+5:302015-09-04T00:30:26+5:30
वेधतेय लक्ष...‘नाथझुंड’

वेधतेय लक्ष...‘नाथझुंड’
नाशिक : त्र्यंबकेश्वर येथून दर बारा वर्षांनी कर्नाटकातील मंगळुरूजवळच्या कदलीमठापर्यंत पदयात्रेने जाणारे ‘नाथझुंडी’तील साधू सध्या श्री काळाराम मंदिरात मुक्कामी असून, त्यांची जीवनशैली हा भाविकांच्या कुतूहलाचा विषय ठरत आहे.दर बारा वर्षांनी कुंभमेळ्यात ही पदयात्रा त्र्यंबकेश्वर येथून निघते. तिचे नाशिक येथे स्वागत होऊन त्यातील नाथसाधू पंचवटीतील श्री काळाराम मंदिरात अठरा दिवसांसाठी मुक्काम करतात व नंतर पुढच्या प्रवासाला निघतात. ही पदयात्रा येत्या महाशिवरात्रीपर्यंत कदलीमठापर्यंत पोहोचणार आहे. यात्रेत या वर्षी आठशे नाथसाधूंचा समावेश आहे. गेल्या २१ आॅगस्टपासून हे साधू श्री काळाराम मंदिरात निवास करीत आहेत. त्यांचा दिनक्रम व जीवनशैली आगळी असून, ती भाविकांचे लक्ष वेधून घेत आहे.
४पहाटे तीन वाजता ‘नागफणी’ या तुतारीसदृश वाद्याने त्यांना झोपेतून जागे केले जाते. प्रातर्विधी व स्नानानंतर धुनीमाता व पात्रदेवतेची मनोभावे आरती केली जाते. नाथझुंडीकडे दोन पात्रदेवता असतात, त्यांपैकी एक पात्रदेवता राजयोग्याकडे, तर दुसरी योगीपीराकडे असते. नागपंचमीच्या दिवशी या पात्रदेवतेची स्थापना त्र्यंबकेश्वरला केली जाते. या देवता घेऊन नाथझुंड अनवाणी पायांनी यात्रेला निघते.
४सध्या या पात्रदेवता योगी निर्मलनाथ राजे व योगीपीर श्यामनाथजी यांच्याकडे आहेत. त्यांपैकी योगीपीर श्यामनाथजी हे पात्रदेवता घेऊन तुळजापूरजवळच्या ‘सोनरी भैरव’ येथे थांबतील, तर योगी निर्मलनाथ राजे हे आपली पात्रदेवता घेऊन पुढे जातील. नाथझुंडीतील साधू दिवसातून तीन आरत्या करतात. त्यात दीपारती, धूपारती व धुनीआरती यांचा समावेश असतो. याशिवाय सकाळी गोरक्षचालिसा, गुरुमंत्राचे पठण केले जाते, अशी माहिती रोहित कानडे यांनी दिली.