वावीत मोटारसायकल रॅली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2020 00:11 IST2020-02-19T23:42:57+5:302020-02-20T00:11:05+5:30
वावी : येथे शिवाजी चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास दुग्धाभिषेक घालून मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात ...

वावीत मोटारसायकल रॅली
वावी : येथे शिवाजी चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास दुग्धाभिषेक घालून मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले. सरपंच नंदा गावडे, उपसरपंच सतीश भुतडा, विकास सोसायटीचे अध्यक्ष विजय काटे, सहायक पोलीस निरीक्षक रणजित गलांडे, माजी सरपंच विठ्ठल राजेभोसले, सदस्य प्रशांत कर्पे, ईलाहीबक्ष शेख, किरण घेगडमल, उत्सव समितीचे अध्यक्ष लक्ष्मण नवले यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन करण्यात आले. त्यानंतर गावात मोटारसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. गावातील शेकडो तरुण भगवे फेटे व दुचाकीला ध्वज बांधून मोटारसायकल रॅलीत सहभागी झाले होते. छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करीत गाव व परिसरात मोटारसायकल रॅली काढण्यात आली. ठाणगाव पुं. रा. भोर विद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९० वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. विद्यालयाचे प्राचार्य व्ही. एस. कवडे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कार्यक्रमास नामदेव शिंदे, शालेय समितीचे डी. एम. आव्हाड, अरुण केदार, ज्ञानेश्वर शिरसाठ, ए. बी. कचरे, आर. सी. काकड आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यालयात मान्यवरांच्या हस्ते शिवछत्रपतींच्या पुतळ्याचे पूजन करण्यात आले, त्यावेळी विद्यार्थ्यांनी दिलेल्या शिवछत्रपतींच्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला.