वाहेगावसाळला भरदिवसा चोरी
By Admin | Updated: September 17, 2016 22:37 IST2016-09-17T22:36:42+5:302016-09-17T22:37:57+5:30
वाहेगावसाळला भरदिवसा चोरी

वाहेगावसाळला भरदिवसा चोरी
तळेगावरोही : वाहेगावसाळ येथे भरदिवसा चोरी झाल्याने दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. चोरट्यांनी येथे दोन वेगवेगळ्या ठिकाणी चोरीचा प्रयत्न केला,
मात्र एक ठिकाणी तो अयशस्वी झाला. येथील हिराबाई खैरे (७५) मुले बाजीराव, दिलीप व सूनबाई शोभा यांच्यासमवेत राहतात. दोन्ही मुले बाहेरगावी गेले असताना व सूनबाई शेतात कामास गेली असताना शुक्रवारी भरदिवसा दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास मोटारसायकलने आलेल्या २५ ते २७ वयोगटातील चोरट्यांनी हिराबाई यांना, ‘आम्ही निमोण येथून आलो असून, तुमचा मुलगा बाजीरावचा अपघात झाला असून, तो दवाखान्यात आहे. त्याने आईकडून रोख पैसे आणावे अन्यथा दागिने आणावे, असे आम्हास सांगितले तर तुम्ही कपाटातून बाजीरावची पत्नी शोभा यांचे दागिने व तुमच्या गळ्यातील सोन्याची पोत, डोरले तसेच कपाटात असलेले झुबे तातडीने काढून द्या’ असे सांगितले. मात्र हिराबाई यांनी विरोध केला असता चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील पोत आदि दागिने असा हिसकावून घेत २२,५०० रुपयांचा ऐवज लंपास केला. चांदवड पोलीस स्टेशनला चोरीचा गुन्हा दाखल झाला असून, पोलीस निरीक्षक अनंत मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार आर.एस. मार्तंड, सागर शेवाळे हे करीत
आहेत. (वार्ताहर)