कॉँग्रेसच्या वत्सला खैरे यांची

By Admin | Updated: October 19, 2015 22:40 IST2015-10-19T22:39:38+5:302015-10-19T22:40:14+5:30

कॉँग्रेसच्या वत्सला खैरे यांची

Vatsala Khaire of Congress | कॉँग्रेसच्या वत्सला खैरे यांची

कॉँग्रेसच्या वत्सला खैरे यांची


सभापतिपदी निवड निश्चितउद्या निवडणूक : महिला बालकल्याण समितीनाशिक : महापालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापतिपदासाठी महाआघाडीकडून कॉँग्रेसच्या वत्सला खैरे यांचा, तर उपसभापतिपदासाठी मनसेच्या शीतल भामरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने आणि समितीवर महाआघाडीचे सर्वाधिक संख्याबळ पाहता दोहोंची निवड निश्चित मानली जात आहे. बुधवारी (दि.२१) सकाळी ११ वाजता निवडणूक प्रक्रिया राबविली जाणार आहे.
महापालिकेच्या महिला व बालकल्याण समितीवर मनसेच्या रत्नमाला राणे, मेघा साळवे व शीतल भामरे, राष्ट्रवादीच्या रूपाली गावंड व शोभा आवारे, शिवसेनेच्या नंदिनी जाधव आणि रिपाइंचे सुनील वाघ तसेच कॉँग्रेसच्या वत्सला खैरे आणि भाजपाच्या रंजना भानसी यांची नियुक्ती झालेली आहे.

Web Title: Vatsala Khaire of Congress