वसंतराव नाईक पतसंस्थेची निवडणूक बिनविरोध

By Admin | Updated: July 4, 2016 23:05 IST2016-07-04T23:04:22+5:302016-07-04T23:05:30+5:30

वसंतराव नाईक पतसंस्थेची निवडणूक बिनविरोध

Vasantrao Naik's election of the elected unanimous election | वसंतराव नाईक पतसंस्थेची निवडणूक बिनविरोध

वसंतराव नाईक पतसंस्थेची निवडणूक बिनविरोध

 नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे येथील क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध पार पडली.
गेल्या महिन्यात पतसंस्थेच्या संचालक मंडळाची मुदत संपल्याने २०१६ ते २०२१ या पाच वर्षाकरिता निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला होता. बारा वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या या पतसंस्थेच्या बिनविरोध निवडीची परंपरा यंदाही कायम राहिली. निवडणूक निर्णय अधिकारी एस. बी. कासार यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या निवडणूक प्रक्रियेत १३ जागांसाठी १८ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. छाननीत पाच अर्ज बाद झाल्याने १३ जागांसाठी १३ अर्ज शिल्लक राहिले होते.
गुरुवारी (दि. ७) सकाळी ११ वाजता संस्थेच्या कार्यालयात नूतन अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.(वार्ताहर)

Web Title: Vasantrao Naik's election of the elected unanimous election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.