शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
3
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
4
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
5
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
6
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
7
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
8
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
9
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
10
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
11
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
12
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
13
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
14
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
15
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
16
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
17
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
18
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
19
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
20
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल

भंडारदऱ्यात रंगला ‘वर्षा महोत्सव’; पर्यटकांना मेजवानी मोठ्या वीकेण्डमुळे अभयारण्यात गर्दी

By अझहर शेख | Updated: August 14, 2023 16:24 IST

मोठ्या वीकेण्डची संधी साधत भंडारदरा येथे कळसुबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्यात पर्यटन संचालनालयाने ‘वर्षा महोत्सव’ भरविला आहे. यामुळे शेकडो पर्यटकांसाठी ही पर्वणी ठरत आहे.

नाशिक : कोवळा सुर्यप्रकाश पडत नाही, तोच पुन्हा आकाशी मेघांची गर्दी दाटून येते अन् वाऱ्याच्या वेगात कधी मध्यम तर कधी जोरदार सरींचा वर्षाव होतो. सर्वत्र दाटलेली हिरवळ अन् वाहणारे धबधबे अशा निसर्गरम्य वातावरणाचा पर्यटक आनंद घेत आहेत. मोठ्या वीकेण्डची संधी साधत भंडारदरा येथे कळसुबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्यात पर्यटन संचालनालयाने ‘वर्षा महोत्सव’ भरविला आहे. यामुळे शेकडो पर्यटकांसाठी ही पर्वणी ठरत आहे.

 वर्षा पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या अहमदनगर-नाशिक जिल्ह्याच्या सीमेवरील भंडारदरा येथील कळसुबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्यात पर्यटकांची मोठी गर्दी लोटली आहे. येथील विविध धबधबे पर्यटकांना भुरळ घालत आहेत. शनिवारी (दि.१२) येथे पर्यटन संचालनालायकडून ‘वर्षा महोत्सव’ सुरू करण्यात आला. उदघाटनाची औपचारिकता पार पडली नसली तरीदेखील पाच दिवसीय महोत्सवाला जोरदार सुरूवात झाल्याचा दावा पर्यटन संचालनालयाने केला आहे. सोमवारपर्यंत (दि.१४) सुमारे ५०० पर्यटकांनी या महोत्सवाचा आनंद लुटल्याची माहिती नाशिक येथील पर्यटन संचालनालयाच्या उपसंचालक कार्यालयाने दिली आहे. या दोन दिवसांत आदिवासी कलावंतांनी नृत्याद्वारे लोककलेचे सादरीकरण पर्यटकांपुढे केले. तसेच घाटघर येथे वारली चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. वर्षा महोत्सवाची सांगता बुधवारी (दि.१६) बांबू वस्तू बनविण्याची कार्यशाळा,मनोरंजनात्मक कार्यक्रमासह उडदावणे येथे आदिवासी बोहाडा नृत्य अशा विविध कार्यक्रमांनी होणार आहे. समारोपप्रसंगी महोत्सवात सहभागी आदिवासी कलावंतांना सन्मानपत्राने गौरविण्यात येणार आहे.

विविध राज्यातील पर्यटकांचा सहभाग‘फॅम टूर’द्वारे राज्यासह गुजरात, राजस्थान, कर्नाटक, तेलंगणा, दिल्ली, छत्तीसगड, पश्चिम बंगाल या राज्यातील पर्यटन व्यावसायिक सहभागी झाले होते. या टूरने येथील विविध पर्यटनस्थळांना भेटी दिल्या. न्हाणी धबधबा, नेकलेस फॉल, वसुंधरा फॉल, अमृतेश्वर मंदिर, घाटघर आदी ठिकाणी फेरफटका मारत निसर्गसौंदर्याचा मनमुराद आनंद लुटला.

सांदण दरीत थरार...येथील साम्रद गावात असलेल्या आशियामधील दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वात मोठ्या सांदण दरीत पर्यटकांनी सोमवारी (दि.१४) साहसी पर्यटनाचा थरार अनुभवला. यावेळी तरूणाईने ‘झिप लाइन’द्वारे दरी पार करण्याचा साहसी अनुभव घेतला. 

टॅग्स :Nashikनाशिक