सेना-कॉँग्रेसच्या पुरस्कृतांना विभिन्न चिन्ह

By Admin | Updated: February 11, 2017 00:05 IST2017-02-11T00:04:53+5:302017-02-11T00:05:05+5:30

प्रभाग ३० : एकसमान चिन्हाची मागणी फेटाळली

Various symbols for Army-Congress harvesting | सेना-कॉँग्रेसच्या पुरस्कृतांना विभिन्न चिन्ह

सेना-कॉँग्रेसच्या पुरस्कृतांना विभिन्न चिन्ह

नाशिक : प्रभाग तीस हा महापालिकेच्या निवडणुकीत सध्या विविध कारणास्तव चर्चेत आहे. या प्रभागातून शिवसेना, भाजपा, कॉँग्रेस या प्रमुख पक्षांसह अपक्ष उमेदवारही निवडणूक रिंगणात आहे. सेना व कॉँग्रेसच्या पुरस्कृत उमेदवारांच्या पदरी निराशा पडली. कारण एकसमान निवडणूक चिन्ह देण्याची मागणी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी फे टाळून लावली. यामुळे सेनेकडून पुरस्कृत मात्र अपक्ष उमेदवारी करणाऱ्या चारही उमेदवारांना स्वतंत्र चिन्ह घेत प्रचार करावा लागणार आहे.
प्रभाग तीसमध्ये अनुसूचित जाती (अ), नागरिकांचा मागासवर्ग महिला (ब), सर्वसाधारण महिला (क), सर्वसाधारण (ड) असे आरक्षण आहे. या प्रभागातून कॉँग्रेसच्या एकमेव अधिकृत उमेदवार रत्ना जय कोतवाल अनुसूचित जातीमधून तर भाजपाकडून सुप्रिया खोडे, सतीश सोनवणे, श्याम बडोदे, दीपाली कुलकर्णी हे चार उमेदवार रिंगणात आहेत. शिवसेनेच्या एकाही उमेदवाराच्या अर्जासोबत पक्षाचे एबी फॉर्म नसल्यामुळे संजय चव्हाण, रशिदा शेख, नीलेश चव्हाण, शकुंतला खोडे यांना अपक्ष म्हणून पाण्याचा जग, चहाची किटली, पाटी, नारळ अशी निवडणूक चिन्ह वाटप करण्यात आले आहे. यामुळे शिवसेनेला मोठा हादरा बसला असून, एकसमान चिन्हाची मागणीदेखील फेटाळून लावण्यात आली. राष्ट्रवादी व कॉँग्रेस या पक्षांचीदेखील थोड्याफार फरकाने अशीच अवस्था असून, राष्ट्रवादीच्या पुरस्कृत उमेदवार आशाबी शेख यांनाही अपक्ष म्हणून अंगठी या चिन्हाद्वारे निवडणूक लढवावी लागणार आहे.

Web Title: Various symbols for Army-Congress harvesting