पिंपळगाव बसवंत : कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने यावर्षी कोणतीही मिरवणूक न काढता फक्त महापुरुषांचे व क्रांतिवीरांचे पूजन करून आदिवासी शक्ती सेनेकडून ठिकठिकाणी आदिवासी दिन साजरा करण्यात आला.प्रारंभी आदिवासी शक्ती सेनेने क्रांतिवीरांच्या नावासाठी लढा दिलेल्या जानोरी येथील काजी गेटजवळील सर्कलचे नामकरण पंचायत समिती सदस्य व राष्टÑवादीचे दिंडोरी तालुका अध्यक्ष भगरे यांच्या हस्ते करण्यात आले व त्यानंतर जानोरी, शिवाजी नगर, पिंपळगाव बसवंत, आहेरगाव, अंबिकानगर, कारसूळ, वडनेर आदी ठिकाणी क्रांतिवीरांचे पूजन करून माक्स व सॅनिटाइझरचे वाटप करण्यात आले. यावेळी संस्थापक अध्यक्ष अर्जुन गांगुर्डे, प्रभाकर फसाळे, वंदना कुडमते, रामकृष्ण कंक, सोमनाथ वतार, बळीराम वाघ, अंकुश वाघ, भारत कडाळे, रेखा भोये, योगेश देशमुख आदीसह समाज बांधव उपस्थित होते.
पिंपळगाव बसवंतसह परिसरात आदिवासी दिनी विविध कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2020 00:09 IST
पिंपळगाव बसवंत : कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने यावर्षी कोणतीही मिरवणूक न काढता फक्त महापुरुषांचे व क्रांतिवीरांचे पूजन करून आदिवासी शक्ती सेनेकडून ठिकठिकाणी आदिवासी दिन साजरा करण्यात आला.
पिंपळगाव बसवंतसह परिसरात आदिवासी दिनी विविध कार्यक्रम
ठळक मुद्दे क्रांतिवीरांचे पूजन करून माक्स व सॅनिटाइझरचे वाटप