शहीद दिनानिमित्त आज विविध कार्यक्रम
By Admin | Updated: March 22, 2016 22:51 IST2016-03-22T22:50:55+5:302016-03-22T22:51:08+5:30
शहीद दिनानिमित्त आज विविध कार्यक्रम

शहीद दिनानिमित्त आज विविध कार्यक्रम
सिन्नर : शहीद दिनानिमित्त क्रांतिवीर भगतसिंग, राजगुरू व सुखदेव यांना सिन्नर येथे अभिवादन करण्यात येणार आहे. यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
येथील वंदे मातरम् संघटनेच्या वतीने बुधवारी (दि.२३) सकाळी साडेनऊ वाजता हुतात्मा स्मारकात शहीद दिन साजरा केला जाणार आहे. यावेळी उपस्थित राहण्याचे आवाहन संघटनेचे अध्यक्ष किरण गवळी, सचिव मनोज भंडारी, पराग शहा, जितेंद्र कोथमिरे, सुधीर वाईकर यांच्यासह सभासदांनी केले आहे. सकाळी साडेआठ वाजता शिवाजी चौकात महामित्र परिवाराच्या वतीने शहीद दिन साजरा केला जाणार असल्याची माहिती अध्यक्ष दत्ता वायचळे यांनी दिली. त्याचबरोबर शहीद दिनानिमित्त तहसील कार्यालय, पंचायत समिती यांच्यासह विविध शासकीय कार्यालय, शाळा, महाविद्यालयात शहीद दिन साजरा केला जाणार आहे. (वार्ताहर)