Various programs on the occasion of Tribal Day | आदिवासी दिनानिमित्त विविध कार्यक्रम

आदिवासी दिनानिमित्त विविध कार्यक्रम

ठळक मुद्देप्रतिमापूजन : ठिकठिकाणी सत्कार; मास्क वाटपाचाही उपक्रम

लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : आदिवासी दिनानिमित्त शहर परिसरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. ठिकठिकाणी बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तसेच विविध ठिकाणी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
भगूर येथील मोठा गणपती लहवितरोडवरील आदिवासी बांधवांनी जागतिक आदिवासी दिन सण म्हणून साजरा केला. आदिवासी समाज समिती भगूर, राणी दुर्गावती महिला बचत गट, शबरी महिला बचत गट, आदिवासी युवा मंच यांच्या संयुक्त विद्यमानाने सकाळी १० वाजता मोठा गणपती लहवितरोड येथे सर्व आदिवासी बंधू-भगिनींनी फिजिकल डिस्टन ठेवून नगरसेविका संगीता पिंपळे यांच्या हस्ते उपस्थित बंधू-भगिनींना मास्क वाटप करण्यात आले.
याकार्यक्र म प्रसंगी निर्भय पथक प्रमुख युनिट चारचा महिला पोलीस उपनिरीक्षक वैशाली मुकणे, माजी सरपंच सारिका निंबेकर, माजी सरपंच गौरी पवार, नगरसेविका संगीता पिंपळे, माजी नगरसेविका सुमन घोरपडे आदी मान्यवरांच्या हस्ते राघोजी भांगरे, बिरसा मुंडे, खाज्या नाईक, भगवान एकलव्य, छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, तंट्या भील, हलदी भाई भिल्ल आदींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले. कॉँग्रेस कमिटीत बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजनआदिवासी दिनानिमित्ताने नाशिक शहर कॉँग्रेस कमिटी येथे आदिवासी समाजासाठी झटणारे राष्टÑपुरुष बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. नाशिक शहर कॉँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शरद अहेर, माजी मंत्री शोभा बच्छाव, प्रदेश प्रवक्ता हेमलता पाटील, नगरसेविका वत्सला खैरे, आशा तडवी यांनी मनोगत व्यक्त केले.
याप्रसंगी सेवादल शहर अध्यक्ष वसंत ठाकूर, मागासवर्गीय प्रदेश सचिव सुरेश मारू , अनिल बहोत, मध्य ब्लॉग अध्यक्ष नीलेश खैरे, मागासवर्गीय जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर काळे, राजकुमार जैप, माजी नगरसेवक लक्ष्मण जायभावे, हानिफ बशीर, अण्णा धोतरे, कैलास कडलग आदी उपस्थित होते. आभार शहर अध्यक्ष अनुसूचित जमातीचे ठाकूर यांनी मानले.

Web Title: Various programs on the occasion of Tribal Day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.